किया इंडिया मोटर्स 2025 (फोटो- सोशल मीडिया)
किया इंडियाच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ
कंपनीने २,८०,२८६ युनिट्सची एकूण घाऊक विक्री नोंदवली
किया इंडियाने सकारात्मक झाला समारोप
Automobile News: किया ही भारतातील एक लोकप्रिय ऑटोमोबाइल कंपनी आहे. देशातील आपल्या ग्राहकांसाठी किया इंडिया ही कंपनी सातत्याने नवनवीन कार्स लॉंच करत असते. त्यामध्ये नवनवीन फीचर्स आणि आधुनिक सोयीसुविधा देत असते. ज्यामुळे ग्राहकांचा प्रवास सुरक्षित व आरामदायी व्हावा.दरम्यान डिसेंबर 2025 मध्ये किया इंडियाने मोठा टप्पा पार केला आहे.
आघाडीची मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनी किया इंडियाने 2025 या कॅलेंडर वर्षाचा समारोप विशेषरित्या केला. कंपनीने 2,80,286 युनिट्सची एकूण घाऊक विक्री नोंदवली आहे. जेथे 2024 मधील 2,45,000 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत वार्षिक 15 टक्के वाढ नोंदवली आहे. ही सातत्यपूर्ण कामगिरी कंपनीचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, उत्पादनांमधील निरंतर नाविन्यता, ग्राहकांची शाश्वत मागणी आणि अनुकूल बाजारपेठ अधोरेखित करते.
वर्षाचा समारोप सकारात्मक झाला असून 18,569 युनिट्सच्या विक्रीसह कंपनीने आपल्या स्थापनेपासून डिसेंबरमधील सर्वोत्तम विक्रीची नोंद केली आहे. डिसेंबर 2024 मधील 8957 युनिट्सच्या तुलनेत वार्षिक 105 टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांवरील लक्ष आणि सुधारित ग्राहक भावना यांमुळे ही वाढ झाली आहे.
या कामगिरीवर आणि भविष्यातील वाटचालीवर भाष्य करताना सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, “किया इंडियासाठी 2025 हे वर्ष सातत्यपूर्ण आणि शाश्वत वाढीचे राहिले. कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही यांसारखी धोरणात्मक उत्पादने बाजारात आणणे; सेल्टोस, कॅरेन्स आणि सोनेट यांसारख्या प्रमुख मॉडेल्समध्ये श्रेणी सुधारणा करणे; ऑपरेशनल कार्यक्षमता आणि विक्री, सेवा व ग्राहक संवादामध्ये सातत्याने केलेली प्रगती ही या यशाची कारणे आहेत. पोषक आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांसाठी अनुकूल जीएसटी आराखड्यासारख्या सरकारी धोरणांमुळे ग्राहकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली.” ते पुढे म्हणाले, “2026 कडे पाहताना बदलत्या बाजारपेठेत स्थिर आणि शाश्वत वाढ साधण्यासाठी किया इंडिया मूल्यवर्धित उत्पादने सादर करण्यावर आणि आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये ब्रँड मालकीचा अनुभव अधिक विश्वासार्ह करण्यावर लक्ष केंद्रित करेल.”
कंपनीची लोकप्रिय मॉडेल सोनेटने सलग दुसऱ्या वर्षी 1,00,000 युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे, तसेच सेल्टोसच्या साथीने एकूण विक्रीत मोलाचे योगदान दिले आहे. पोर्टफोलिओमधील इतर मॉडेल्स किया कॅरेन्स, किया कॅरेन्स क्लॅव्हिस आणि किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही यांनाही ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच, प्रीमियम किया कार्निव्हल लिमोझिन आणि ईव्ही६ लक्झरी कार खरेदीदारांना वर्षभर आकर्षित करत राहिले.
ही गती कायम राखत नुकतीच सादर केलेली न्यू किया सेल्टोस 2026 मधील वाढीत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि स्पर्धात्मक एसयूव्ही विभागातील ब्रँडचे स्थान अधिक प्रबळ करेल. सोनेट, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही या मॉडेल्सची सातत्यपूर्ण कामगिरी या वाढीला अधिक बळ देईल.
किया इंडियाने २०२५ या वर्षात देशभरात आपले जाळे अधिक मजबूत केले आहे, जेथे 369 शहरांमध्ये 821 टचपॉइंट्सपर्यंत विस्तार केला आहे. या विस्तारामुळे ग्राहकांसाठी उपलब्धता वाढली असून विक्री आणि सेवा यंत्रणा अधिक प्रबळ झाली आहे. भक्कम पाया, सुधारित उत्पादन पोर्टफोलिओ आणि भविष्याचा स्पष्ट आराखडा यामुळे किया इंडिया 2026 मध्ये फायदेशीर, जबाबदार आणि शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.






