फोटो सौजन्य: @auditurkiye (X.com)
भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कारची वेगळीच डिमांड पाहायला मिळते. परफॉर्मन्सच्या बाबतीत तर या कार्स नेहमीच इतर कार्सच्या तुलनेत जास्त सरस असतात. देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट परफॉर्मन्स कार ऑफर करतात. ऑडी ही त्यातीलच एक कंपनी.
भारतात अनेक सेलिब्रेटी आणि राजकारण्यांच्या कार कलेक्शनमध्ये ऑडीच्या कार पाह्यला मिळतात. ऑडीने अलीकडेच भारतात त्यांची प्रीमियम SUV Audi Q7 Signature Edition एडिशन लाँच केली आहे. ही एक लक्झरी एसयूव्ही आहे जी उत्कृष्ट परफॉर्मन्स, स्टाइल आणि सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे. मात्र, असे बोलले जात आहे की भारतापेक्षा जर्मनीत ही कार खरेदी करणे स्वस्त आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
पेट्रोल-डिझेलला म्हणा राम राम ! ‘या’ 5 Electric Scooters ची किंमत 1 लाखापेक्षा कमी
भारतात ऑडी क्यू७ महाग आहे कारण येथे त्यावर जास्त टॅक्स, शुल्क आणि इम्पोर्ट ड्युटी आकारले जाते. त्यामुळे लक्झरी कारच्या किमती खूप वाढतात. जर्मनी हा ऑडीचा मूळ देश आहे जिथे कंपनी स्वतः कार बनवते आणि विकते. त्यामुळे तिथे टॅक्स आणि किंमतही कमी आहे. म्हणूनच जर्मनीमध्ये ऑडी क्यू7 खरेदी करणे जास्त स्वस्त आहे.
ऑडी क्यू7 ची भारतात किंमत 90.48 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक मॉडेलची किंमत 99.81 लाख रुपयांपर्यंत जाते. त्या तुलनेत, हीच एसयूव्ही जर्मनीमध्ये सुमारे €60,000 मध्ये उपलब्ध आहे, जी सध्याच्या दरानुसार सुमारे 54 लाख रुपये आहे. याचा अर्थ असा की जर्मनीमध्ये ऑडी क्यू7 खरेदी करणे सुमारे 35-45 लाख रुपयांनी स्वस्त असू शकते. मात्र, जर तुम्ही जर्मनीहून भारतात कार इम्पोर्ट केली तर तुम्हाला पुन्हा मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस आणि कस्टम ड्युटी भरावी लागते, ज्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
ऑडी क्यू7 मध्ये 3.0 -लिटर व्ही6 टीएफएसआय पेट्रोल इंजिन आहे, जे 340 HP पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही फक्त 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि याचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. या कारला क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह, अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि 7 वेगवेगळे ड्राइव्ह मोड मिळतात, जे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर स्मूथ रायडिंग फील देतात.
ऑडी क्यू७ सुरक्षिततेच्या बाबतीतही पूर्णपणे सुसज्ज आहे. यात 8 एअरबॅग्ज, लेन डिपार्चर वॉर्निंग, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम (ईएसपी), अॅडॉप्टिव्ह विंडस्क्रीन वायपर्स, एबीएस आणि ईबीडी, पार्क असिस्ट आणि रिव्हर्स कॅमेरा अशी फीचर्स आहेत.