फोटो सौजन्य: iStock
सध्या सगळ्याच क्षेत्रात AI चा शिरकाव होताना दिसत आहे. यामुळे अनेकांची कामं सोपी झाली आहेत.ऑटो इंडस्ट्रीत सुद्धा AI चा वापर होताना दिसत आहे. याच AI टेकनॉलॉजीवर आधारित सेल्फ ड्रायव्हिंग कार सुद्धा मार्केटमध्ये लाँच होत आहे. यामुळे नक्कीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पुढील काळात फक्त चॅटबॉट्स किंवा टेक कंपन्यांपुरते मर्यादित राहणार नसून ते संपूर्ण ऑटो इंडस्ट्रीचे चित्र बदलणार आहे. एका नव्या अहवालानुसार, 2030 पर्यंत जगभरात 4 ते 5 कोटी कार डील्सवर जनरेटिव्ह एआय (Gen AI) असिस्टंटचा प्रभाव दिसून येईल. चला पाहूया, यामुळे वाहन कंपन्यांच्या विक्रीवर याच काय परिणाम होणार आहे?
OpenAI आणि Boston Consulting Group (BCG) च्या अहवालानुसार, ज्या वाहन कंपन्या लवकरात लवकर AI-पावर्ड कस्टमर एक्स्पिरियन्स आणतील त्यांची विक्री 20% पर्यंत वाढू शकते. पण ज्या कंपन्या हा बदल स्वीकारण्यात मागे पडतील त्यांना 15% पर्यंत महसुली तोटा सहन करावा लागू शकतो.
किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच
भविष्यात AI-पावर्ड चॅटबॉट्स आणि असिस्टंट्स ग्राहकांसाठी एक न्यूट्रल सल्लागार म्हणून काम करतील. त्यांच्या मदतीने ग्राहक आपली पसंतीची कार कॉन्फिगर करू शकतील, कर्जाच्या पर्यायांची तुलना करू शकतील आणि थेट टेस्ट ड्राइव्ह बुक करू शकतील. यामुळे ब्रँड लॉयल्टी कमी होईल. खरेदीदार केवळ किंमत, मायलेज आणि फीचर्स यांसारख्या प्रॅक्टिकल घटकांच्या आधारावर कारची तुलना करून खरेदीचा निर्णय घेतील.
अहवालात असेही म्हंटले आहे की वाहन कंपन्यांना ग्राहकांशी जोडलेले राहण्यासाठी AI-पावर्ड प्लॅटफॉर्मवर आपली मजबूत उपस्थिती दाखवावी लागेल. यासाठी त्या मल्टी-ब्रँड मार्केटप्लेसचा भाग बनू शकतात किंवा स्वतःचे ब्रँडेड AI असिस्टंट्स लाँच करू शकतात. यामुळे कंपन्या ग्राहकांना हायपर-पर्सनलाइज्ड बायिंग एक्स्पिरियन्स देऊ शकतील आणि बाजारपेठेत आपली ओळख टिकवू शकतील.
350 CC सेगमेंटमध्ये ‘या’ 2 बाईक म्हणजे कहरच! फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोण मारते बाजी?
आज अनेकदा असे घडते की ग्राहक कार्सची माहिती घेतात पण खरेदी करत नाहीत. मात्र, AI-पावर्ड चॅटबॉट्स प्रत्येक भाषेत, 24×7 उपलब्ध राहतील. ते त्वरित प्रश्नांची उत्तरे देतील आणि टेस्ट ड्राइव्ह बुक करण्यात मदत करतील. .
सोप्या भाषेत सांगायचे तर, 2030 पर्यंत AI संपूर्ण ऑटो इंडस्ट्री बदलणार आहे. ग्राहकांसाठी कार खरेदी अधिक सोपी व पारदर्शक होईल, तर कंपन्यांना जास्त विक्री आणि खर्चात बचत करण्याची संधी मिळेल. पण, ज्या कंपन्या या बदलाला वेळेत स्वीकारणार नाहीत त्या बाजारात मागे राहतील, हे नक्की.