कोण म्हणतं महिलांना कार चालवता येत नाही ! Women With Drive उपक्रमात 35 हून अधिक महिलांचा सहभाग
Autocar India आणि Mahindra & Mahindra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Women With Drive या उपक्रमाचा पाचवा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त व्हिक्टोरिया साउथ, मुंबई येथून सुरू झालेल्या या रोमांचक प्रवासात, 35 हून अधिक महिलांनी भाग घेतला. या कार्यक्रमात महिलांनी Aamby Valley Airstrip येथे वेग, अचूकता आणि धाडसाची परीक्षा पाहणाऱ्या विविध आव्हानांमध्ये भाग घेतला.
महिंद्राच्या अत्याधुनिक XUV700 च्या ताफ्यातून हा प्रवास सुरू झाला, ज्यानंतर Aamby Valley येथे महिंद्राच्या इतर दमदार SUV गाड्यांची प्रतीक्षा होती. दमदार महामार्गावर XUV700 च्या आरामदायी आणि तंत्रज्ञानाने समृद्ध ड्रायव्हिंग अनुभवाचा आनंद घेतल्यानंतर, महिला चालकांनी रोमांचक आव्हानांचा सामना केला.
बाईक चोरी झाल्यास कसे मिळवाल इन्श्युरन्सचे सगळे पैसे? प्रत्येक बाईकस्वाराला ठाऊक असायलाच हवं
या कार्यक्रमात महिलांच्या आत्मविश्वासासोबत महिंद्राच्या SUV गाड्यांचे उत्कृष्टता देखील अधोरेखित करण्यात आली. वेगवान Autocross Challenge, आव्हानात्मक Off-Road Trails, तसेच Packing Challenge यांसारख्या स्पर्धांमधून महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली.
XUV700 ने हा प्रवास अधिक आनंददायी बनवला. त्याच्या AdrenoX इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि 12-स्पीकर Sony 3D ऑडिओ सिस्टम मुळे प्रवास अधिक मनोरंजक झाला. ADAS सिस्टम (Adaptive Cruise Control आणि Lane Keep Assist) मुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा झाला. 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम यामुळे गाडी चालवणे अधिक सोयीस्कर झाले.
या गाडीने Autocross Challenge मध्ये भाग घेतला, जिथे Zoom ड्रायव्हिंग मोड मुळे चालकांना जलद गती आणि अचूक नियंत्रणाचा अनुभव आला. Packing Challenge मध्ये या गाडीच्या स्मार्ट स्टोरेज सोल्यूशन्सची चाचणी घेण्यात आली.
4XPLOD 4WD प्रणाली आणि Penta-link सस्पेंशन मुळे Scorpio-N ने खडबडीत रस्त्यांवर सहज प्रवास केला. प्रथमच ऑफ-रोडिंग करणाऱ्या महिलांसाठी ही SUV एक आत्मविश्वास वाढवणारा अनुभव ठरली.
Thar 3-Door ने देखील ऑफ-रोडिंग टेस्टिंगमध्ये उत्तम कामगिरी केली. लो-गिअरबॉक्स आणि 4WD पॉवरट्रेन मुळे खडतर रस्त्यांवरही ही गाडी सहज धावली.
Autocar India’s 2025 Car of The Year असलेल्या Thar Roxx ने Parking Challenge मध्ये भाग घेतला. 360-डिग्री कॅमेरा सिस्टम आणि हलकी स्टिअरिंग प्रणालीमुळे पार्किंग करणे अधिक सुलभ झाले.
Autocar Indiaच्या Renuka Kirpalani यांनी सांगितले, “या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना गाड्या चालवण्याचा आत्मविश्वास मिळवून देणे आहे. त्यांना वेगाची आणि ड्रायव्हिंगची खरी मजा अनुभवायला मिळाली, हे पाहून आम्हाला आनंद वाटतो.”
महिंद्रा ऑटोमोटिव्हच्या CMO, मंजरी उपाध्याय म्हणाल्या, “महिंद्रासाठी सशक्तीकरण म्हणजे केवळ गाड्या चालवणे नव्हे, तर प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे. महिला ज्या आत्मविश्वासाने रस्त्यावर गाडी चालवत आहेत, त्याच आत्मविश्वासाने त्या जग बदलत आहेत.”
Women With Drive 2025 या कार्यक्रमाने महिलांना आत्मविश्वास, रोमांच आणि ड्रायव्हिंगची खरी मजा अनुभवण्याची संधी दिली. महामार्ग असो वा ऑफ-रोडिंग ट्रेल्स, प्रत्येक सहभागीने हे सिद्ध केले की महिलाही उत्कृष्ट चालक बनू शकतात.