फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची बाईक असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मग काही जण बजेट फ्रेंडली बाईक खरेदी करतात तर काही जण स्पोर्ट बाईक खरेदी करतात. काही जणांसाठी तर बाईक म्हणजे जीवाचा तुकडा असतो. अशावेळी जर हीच बाईक चोरी झाली तर अनेक जण गोंधळून जातात आणि पुढे काय करावं? याबाबत विचार करून करून थकतात.
सध्या बाईक चोरी व्हायचे प्रमाण वाढले आहे. कोणता चोर कधी कोणाची बाईक चोरले हे कोणालाच माहीत नाही. त्याच वेळी, बाईक अनेक लोकांच्या हृदयाच्या जवळ असतात आणि जर त्या चोरीला गेल्या तर लोक खूप अस्वस्थ होतात. म्हणूनच आज आपण बाईक चोरी झाल्यास ताबडतोब काय केले पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत.
Maharashtra Budget 2025 मध्ये महत्वाचा निर्णय ! चारचाकी गाड्यांवर 1 टक्क्यांनी करवाढ होणार
बाईक चोरीला गेल्यास, सर्वप्रथम तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन दुचाकी चोरी झाल्याची तक्रार नोंदवावी लागेल. यानंतर पोलिस तुम्हाला एफआयआर क्रमांक देईल, जो क्लेम करतानाच्या प्रक्रियेसाठी खूप महत्वाचा आहे.
बाईक चोरीची पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या इंश्युरन्स कंपनीला चोरीच्या घटनेची माहिती द्यावी लागेल. तुमच्या दुचाकी चोरीला गेल्याची माहिती तुम्ही फोन, ईमेल किंवा विमा कंपनीच्या वेबसाइटद्वारे इंश्युरन्स कंपनीला देऊ शकता.
बाईक चोरी झाल्यास, चोरीच्या क्लेमसाठी इंश्युरन्स कंपनीला कळवण्यासोबतच, संबंधित कागदपत्रे आणि क्लेमच्या फॉर्मचे डिटेल्स देखील मिळवा. यानंतर, क्लेम फॉर्म योग्यरित्या भरा आणि सबमिट करा.
किती बी येऊ द्या त्यांना एकटा बास ! ‘या’ स्वदेशी इलेक्ट्रिक कार कंपनीची 42 टक्के मार्केटवर पक्कड
इंश्युरन्स कंपनीला आवश्यक असलेली कागदपत्रे योग्यरित्या तयार करा आणि सादर करा, जी खालीलप्रमाणे असू शकतात.
क्लेमच्या प्रक्रियेदरम्यान, काही विमा कंपन्या तुमची बाईक खरोखर चोरीला गेली आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वतःहून सर्वेक्षण देखील करू शकतात. यासोबतच ते बाईक चोरीचा अहवाल आणि कागदपत्रे देखील तपासातील.
बाईक चोरीची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर, इंश्युरन्स कंपनी तुमचा क्लेम प्रोसेस करते. जर सर्वकाही बरोबर असल्याचे आढळले, तर तुमच्या पॉलिसीनुसार तुम्हाला बाईक इंश्युरन्सची रक्कम दिली जाईल.