फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक प्रमुख ऑटोमोबाईल ब्रँड्स आहेत, जे ग्राहकांच्या विविध आवश्यकतांनुसार उत्कृष्ट कार ऑफर करत आहेत. या ब्रँड्समध्ये आता इलेक्ट्रिक वाहनेही मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होऊ लागली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक ऑटो कंपनी आपापल्या इलेक्ट्रिक कार मॉडेल्स लाँच करत आहे. भारतात अनेक प्रमुख कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार्सची सादरीकरणं केली आहेत, ज्या पर्यावरणपूरक, इंधनक्षम आणि अधिक किफायतशीर ठरत आहेत. या कार्स ग्राहकांना कमी खर्चात व प्रदूषण कमी करण्याची संधी देतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने भारतातील ऑटोमोबाईल उद्योगामध्ये एक नवीन ट्रेंड बनली आहेत.
Maruti Suzuki च्या ‘या’ कार देतात असा भरघोस मायलेज की ग्राहकांची होते बचतीवर बचत
नुकतेच किया मोटर्सने भारतात Kia EV6 ही इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. खरंतर किआच्या कार भारतात खूप पसंत केल्या जातात. गेल्याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये कंपनीच्या सोनेट या एसयूव्हीला 7000 ग्राहक मिळाले यावरून याचा अंदाज येतो. परंतु, त्याच काळात, फक्त 19 लोकांनी कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV6 खरेदी केली आहे. या कालावधीत, वार्षिक आधारावर EV6 च्या विक्रीत जवळपास 60 टक्क्यांनी घट दिसून आली आहे. चला, Kia EV6 च्या फीचर्स आणि ड्रायव्हिंग रेंजबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
Kia EV6 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 12.3-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. याशिवाय, या कारमध्ये वायरलेस फोन चार्जिंगसह सनरूफ देखील आहे.
भारतीय मार्केटमध्ये, टॉप मॉडेलसाठी ईव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 60.97 लाख रुपयांपासून ते 65.97 लाख रुपयांपर्यंत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 8-एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ADAS टेक्नॉलॉजी, ऑटोमॅटिक एमरजन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारखी फीचर्स देनाय्त आली आहेत. भारतीय मार्केटमध्ये, Kia EV6 ची स्पर्धा BMW 14 आणि Hyundai Ioniq 5 सारख्या EV शी आहे.
या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, यामध्ये 77.4kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर 528 किलोमीटरचा प्रवास करण्यास सक्षम आहे. ही EV 50 किलोवॅट DC फास्ट चार्जरला सपोर्ट करते जी 1 तास 13 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करू शकते. तर घरगुती सॉकेटमधून पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 36 तास लागतात.