Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Auto: बजाज ऑटोची सणासुदीची मोठी तयारी! ३ नवी प्रोडक्ट्स आणि २ नवीन ब्रँड्स होणार लाँच!

भारतीय दुचाकी बाजारात सणासुदीच्या तोंडावर एका प्रसिद्ध ऑटो प्रोडक्टने मोठी खेळी खेळण्याची तयारी पूर्ण केली आहे. येणाऱ्या काही दिवसांत नव्या ब्रँड्स आणि गाड्यांचे नवे प्रकार रस्त्यावर उतरणार असून, या निर्णयामागे ग्राहकांच्या पसंतीचा एक विशेष ट्रेंड लपला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 25, 2026 | 04:22 PM
Bajaj Auto: बजाज ऑटोची सणासुदीची मोठी तयारी! ३ नवी प्रोडक्ट्स आणि २ नवीन ब्रँड्स होणार लाँच!
Follow Us
Follow Us:
  • बजाज ऑटो आगामी सणासुदीच्या काळात तीन नवीन उत्पादने आणि दोन नवीन ब्रँड्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
  • कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय पल्सर १२५ आणि पल्सर १५० मोटारसायकलचे अपडेटेड व्हर्जन बाजारात विक्रीसाठी लाँच केले आहे.
  • दुचाकी बाजारातील १२% वाढीसह विशेषतः इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात ८०% ची प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे.

भारतीय दुचाकी बाजारात ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता बजाज ऑटोने येणाऱ्या सणासुदीच्या काळात मोठी तयारी केली आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत ३ नवीन प्रोडक्ट्स आणि २ नवीन ब्रँड्स मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. जुन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासोबतच नवीन ग्राहकांना जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

पल्सर १५० आणि पल्सर १२५ चे नवे व्हर्जन लाँच

कंपनीने नुकतेच आपले सर्वात लोकप्रिय मॉडेल असणाऱ्या पल्सर १२५ आणि पल्सर १५० चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. पल्सर १२५ ची सुरवातीची किंमत ₹९२,९०० (एक्स-शोरूम दिल्ली) तर पल्सर १५० ची किंमत ₹१.१५ लाख (एक्स-शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या नव्या मॉडेल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे आयकॉनिक पल्सर लुक कायम ठेवत बाईकला एक नवीन फील मिळतो.

Pulsar Series vs. Splendor Series : ५ वर्षांच्या वापरानंतर दोन्ही गाड्यांचा मेंटेनन्स खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि रीसेल व्

४५ दिवसांत ३ नवीन प्रोडक्ट्स बाजारात येणार

बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा यांनी सांगितले की, येत्या ४५ दिवसांत कंपनी ३ नवीन उत्पादने बाजारात आणणार असून लवकरच २ नवीन ब्रँड्स देखील लाँच केले जातील. पल्सर १२५ आणि १५० सीसी सेगमेंटमध्ये गेल्या काही काळापासून मोठे अपडेट्स न आल्यामुळे विक्रीत काहीशी संथ गती पाहायला मिळाली होती, मात्र या नवीन अपग्रेडमुळे ही विक्री पुन्हा वेग घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

जुलै महिन्यातील भक्कम विक्रीची आकडेवारी

कंपनीने जुलै महिन्यात विक्रीत तब्बल ३०% वाढ नोंदवली असून एकूण ४,७४,६७७ वाहनांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात ३,६६,००० होती. यामध्ये दुचाकींची देशांतर्गत विक्री १९% वाढून १,६५,७४७ युनिट्सवर पोहोचली आहे. १२० सीसी ते १५० सीसी सेगमेंटमधील तात्पुरती घसरण भरून काढण्यासाठी कंपनीचे नवे लाँचिंग अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!

इंडस्ट्री मधील वाढ आणि सणासुदीचा अंदाज

बजाज ऑटोच्या टू-व्हीलर बिझनेसचे प्रमुख सारंग कानडे यांच्या मते, सध्या संपूर्ण दुचाकी उद्योग सुमारे १२% च्या दराने वाढतो आहे. यामध्ये मोटारसायकल सेगमेंट सुमारे १०% तर इलेक्ट्रिक वाहने तब्बल ८०% च्या प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहेत. १२५ सीसी सेगमेंटचा बाजारपेठेतील वाटा ३ वर्षांतील २५% वरून वाढून २८% झाला आहे, ज्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात दुचाकींची विक्री विक्रमी पातळी गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Bajaj auto launches new brands festive season auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj Auto
  • two wheelers

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.