Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार

बजाज पल्सर 125 आणि 150 च्या नव्या अवतारामागे फक्त मॉडेल अपडेट नाही, तर देशांतर्गत मार्केट शेअर परत मिळवण्याची मोठी रणनीती आहे. देशात विक्री घटत असताना पल्सरची निर्यात वाढतेय, त्यामुळे नव्या बाइक्सकडून नेमकी किती अपेक्षा आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 02:12 PM
बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
Follow Us
Follow Us:
  • बजाज पल्सर 125 ची विक्री 3 टक्क्यांनी घटली, तर TVS Raider ची विक्री 7 टक्क्यांनी वाढली.
  • 125cc-150cc सेगमेंट वाढूनही बजाजच्या विक्रीत 34 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
  • FY2026 मध्ये पल्सरच्या निर्यातीत 18 टक्क्यांची वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे.
भारतीय मोटरसायकल मार्केटमध्ये तब्बल 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केलेल्या बजाज पल्सर ब्रँडसमोर सध्या स्पर्धेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देशांतील विक्रीवर दबाव असताना परदेशातील निर्यात मात्र वेगाने वाढतच आहे. त्यामुळे बजाज ऑटोने आपल्या लोकप्रिय पल्सर 125 आणि पल्सर 150 ला मोठे अपडेट देत नव्याने मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. या दोन्ही बाइक्सचा ओळखीचा क्लासिक लूक कायम ठेवत त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि मेकॅनिकल भागांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

पल्सर 125 समोर असणार तगडी स्पर्धा

125cc सेगमेंट भारतातील सर्वात मोठ्या मोटरसायकल मार्केटपैकी एक आहे. एप्रिल-ऑगस्ट 2026 दरम्यान या सेगमेंटमध्ये होंडाने 17.79 लाख युनिट्ससह आघाडी घेतली, तर बजाजची विक्री 7.93 लाख युनिट्स राहिली. हिरोने 6.17 लाख आणि TVS ने 4.27 लाख युनिट्सची विक्री केली. बजाज पल्सर 125 ची विक्री 3 टक्क्यांनी कमी झाली, तर TVS Raider ची विक्री 7 टक्क्यांनी वाढली. स्पोर्टी डिझाइन आणि फीचर्समुळे रायडर तसेच हिरो Xtreme 125R सारख्या बाइक्स पल्सरसाठी जास्त स्पर्धा निर्माण करत आहेत.

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

पल्सर 150 ला वेगळे आव्हान

150cc सेगमेंटमध्येही परिस्थिती बदलली आहे. एप्रिल-ऑगस्ट 2026 मध्ये 125cc-150cc सेगमेंटमधील देशांतर्गत विक्री 49.5 टक्क्यांनी वाढली, पण बजाजची विक्री तब्बल 34 टक्क्यांनी घटली. परिणामी या सेगमेंटमधील बजाजचा मार्केट शेअर सुमारे 18 टक्क्यांवर आला. 125cc बाइक्स आता जास्त फीचर्स देत आहेत, तर 160cc मोटरसायकल तुलनेने कमी किमतीत जास्त परफॉर्मन्स देतात. त्यामुळे पल्सर 150 मधल्या जागेसाठी झुंज देत आहे.

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

निर्यातीतून बजाजला मोठा आधार

देशांतर्गत विक्री कमी असली तरी निर्यात बजाजसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. FY2026 मध्ये कंपनीने 22.50 लाख वाहने निर्यात केली, जी 20.8 टक्क्यांनी जास्त आहेत. याच काळात मोटरसायकल निर्यात सुमारे 17 टक्क्यांनी वाढली. पल्सरच्या निर्यातीत 18 टक्क्यांची वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे नव्या पल्सर 125 आणि 150 कडून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Bajaj pulsar 125 150 new models to regain market share auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj Auto

संबंधित बातम्या

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
1

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
2

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
3

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
4

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.