फोटो सौजन्य: iStock
भारतात दरवर्षी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरांमध्ये, विशेषतः लहान शहरांमध्ये देखील वाहतूक कोंडी ही सामान्य बाब बनली आहे. वाहनांची वर्दळ वाढल्याने ट्रॅफिक मॅनेजमेंटची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शहरांमध्ये कार चालवणे कठीण बनले आहे. वाहतुकीतील गोंधळामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
देशातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या खूपच त्रासदायक आहे. ट्रॅफिकमध्ये कार चालवणे हे देखील अनेक लोकांसाठी खूप त्रासदायक काम आहे. जर तुम्हालाही ट्रॅफिकमध्ये कार चालवण्यास त्रास होत असेल, तर आज आपण अशा काही टिप्सबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये कार चालवणे सोपे होईल.
मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?
जेव्हा तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कार चालवावी लागते तेव्हा सुरक्षित राहण्यासाठी, समोर आणि मागे असलेल्या वाहनांपासून सुरक्षित अंतर राखून कार चालवणे नेहमीच चांगले. यामुळे कारचे नुकसान तर होतेच, पण स्वतःचेही नुकसान होण्यापासून संरक्षण होते. यासाठी, जेव्हा जेव्हा तुम्ही ब्रेक लावता तेव्हा समोरील कारच्या बंपरकडे नक्की लक्ष द्या.
जर कार बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर बऱ्याचदा चालकाला राग येत असतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो तसेच वादही निर्माण होतो. अशा परिस्थितीत, प्रथम स्वतःला शांत ठेवावे. यासाठी, तुम्ही तुमच्या आवडीची गाणी देखील ऐकू शकता.
अनेक ऑटो कंपन्यांकडून नवीन कार उत्तम फीचर्ससह दिल्या जातात. यापैकी एक फिचर म्हणजे 360 डिग्री कॅमेरा. या फिचरमुळे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये तुमची कार चालवणे सोपे होते. ट्रॅफिकमध्ये हे फीचर सक्रिय केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण माहिती मिळते, ज्यामुळे तुम्ही तुमची कार स्क्रॅच किंवा नुकसान न होता चालवू शकता.
काही लोक ट्रॅफिकमध्ये कार चालवताना अनेकदा लेन बदलत असतात. लेन बदलल्याने अपघाताचा धोकाही वाढतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही ट्रॅफिकमध्ये कार चालवता तेव्हा नेहमी कार त्याच लेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला ती चालवताना कोणताही त्रास होणार नाही.
Tesla चं नशीबच खराब ! ‘या’ फीचरमुळे लागला मोठा फटका, कोर्टाने ठोकला 370 कोटींचा दंड
जर तुम्हालाही ट्रॅफिक आणि गर्दीच्या रस्त्यांवर कार चालवण्यास अडचण येत असेल, तर तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी गुगल मॅप वापरू शकता. मॅपद्वारे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे किती ट्रॅफिक असू शकते याची आधीच माहिती मिळते. जर जास्त ट्रॅफिक असेल, तर दुसरा पर्याय निवडून प्रवास पूर्ण करता येतो. असे केल्याने, ट्रॅफिकमध्ये कार चालवण्याचा त्रास तर दूर होईलच, पण इंधनाचीही बचत होईल.