Tesla चं नशीबच खराब ! 'या' फीचरमुळे लागला मोठा फटका, कोर्टाने ठोकला 370 कोटींचा दंड
जगभरात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करतात. यात आपल्या इलेक्ट्रिक कारने सगळीकडेच हवा करणारी कंपनी म्हणजे टेस्ला. या अमेरिकन ऑटो कंपनीने जगभरात प्रीमियम लूक असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवले आहे. कंपनीने Tesla Model Y भारतात लाँच केली आहे.
टेस्लाच्या कार या त्यांच्या उत्तम फीचर्ससाठी ओळखल्या जातात. मात्र, याच एका फीचरमुळे कंपनीला 370 कोटींचा दंड भरावा लागणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊयात.
1 ऑगस्ट 2025 रोजी, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात मोठा कायदेशीर झटका बसला. ऑटोपायलट सिस्टमशी संबंधित एका प्राणघातक अपघातप्रकरणी मियामीतील ज्युरीने टेस्लाला जबाबदार धरले. परिणामी, कंपनीला पीडितांना एकूण $243 दशलक्ष म्हणजेच सुमारे 370 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
तुमची लाडकी कार हवा तसा मायलेज देत नाही? ‘या’ 5 ट्रिक्सने झटपट वाढेल परफॉर्मन्स
खरं तर, हा निर्णय मोठा आहे कारण पहिल्यांदाच ज्युरीने ऑटोपायलट अपघातासाठी टेस्लाला थेट जबाबदार धरले आहे. हे प्रकरण भविष्यात अशा अनेक प्रकरणांची सुरुवात असू शकते, ज्यामध्ये टेस्लाच्या सेल्फ-ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्याच्या प्रमोशन पद्धतींबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
25 एप्रिल 2019 रोजी जॉर्ज मॅकगी यांच्या टेस्ला मॉडेल एस कारने फ्लोरिडाच्या की लार्गो भागात ऑटोपायलट मोडमध्ये हाय स्पीडने टी-जंक्शन ओलांडले आणि पार्क केलेल्या शेवरलेट ताहो एसयूव्हीशी टक्कर झाली तेव्हा ऑटोपायलट अपघात प्रकरण उघडकीस आले. या अपघातात 22 वर्षीय निबेल बेनाविड्स लिओनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र डिलन अँगुलो गंभीर जखमी झाला. अपघातादरम्यान मॅकगीचा मोबाईल फोन पडला, जो उचलण्यासाठी तो वाकला. त्याच वेळी, स्टॉप साइन आणि लाईट्सकडे दुर्लक्ष करून कारने त्याला जोरदार धडक दिली.
फ्लोरिडा कोर्टातील ज्युरीने आपला निकाल देताना 2019 मध्ये झालेल्या अपघातासाठी टेस्लाला 33 टक्के दोषी ठरवले, तर उर्वरित 67 टक्के जबाबदारी ड्रायव्हर जॉर्ज मॅकगीवर टाकण्यात आली. या निकालाअंतर्गत, न्यायालयाने टेस्लाला एकूण 243 दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले. या रकमेत 129 दशलक्ष डॉलर्सचे प्रत्यक्ष नुकसान आणि 200 दशलक्ष डॉलर्सचे दंडात्मक नुकसान समाविष्ट आहे.
Honda Motorcycle And Scooter India जुलै 2025 मध्ये 5,15,378 युनिट्सची केली विक्री, 20% वाढ
पीडितांच्या वकिलांनी आरोप केला की टेस्लाने त्याच्या ऑटोपायलट सिस्टमच्या क्षमता अतिशयोक्तीपूर्ण केल्या आहेत, ज्यामुळे कार चालक आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागले. त्यांनी न्यायालयात टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्या विधानांचाही उल्लेख केला, ज्यात त्यांनी दावा केला होता की, “टेस्लाचा ऑटोपायलट माणसांपेक्षा चांगला कार चालवतो.”
टेस्लाने न्यायालयात म्हटले की या अपघातासाठी ते पूर्णपणे जबाबदार नाहीत, कारण ड्रायव्हर मॅकगीने स्वतः एक्सीलरेटर दाबून ऑटोपायलटला ओव्हररोड केले. कंपनी म्हणते की त्यांच्या कार्स ड्रायव्हरला स्पष्टपणे सावधान करतात की त्यांनी नेहमी त्यांचे हात स्टीअरिंग व्हीलवर ठेवावे आणि सतर्क राहावे.