
'या' खास फीचर्समुळेच तर New Renault Duster ठरू शकते इतर कारपेक्षा वरचढ
भारतीय एसयूव्ही खरेदीदारांच्या आवडी आणि बाजारपेठेतील गरजा लक्षात घेऊन, रेनॉल्टने डस्टरचे एक खास व्हर्जन विकसित केले आहे. चला नवीन रेनॉल्ट डस्टरच्या प्रमुख फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवीन जनरेशनची रेनॉल्ट डस्टर भारतीय एसयूव्ही आवडींशी अधिक सुसंगत दिसते. समोरील ग्रिलवर ठळक डस्टर अक्षरे आहेत. यात बॉक्सी आणि मस्क्युलर सिल्हूट, एसयूव्ही प्रमाण, 212 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 18-इंच अलॉय व्हील्स आणि 225-सेक्शन टायर्स आहेत. यासोबतच एलईडी डीआरएल, एलईडी टेललॅम्प आणि मागील बाजूस बॉडी क्लॅडिंग सारखे एलिमेंट्स या कारचे आकर्षण आणखी वाढवतात.
इंडिया-स्पेक Renault Duster चे केबिन प्रॅक्टिकल आणि प्रशस्त आहे. मागील सीट्सवर तीन अॅडजस्टेबल हेडरेस्ट, सेंटर आर्मरेस्ट, रियर AC वेंट्स, USB Type-C पोर्ट्स आणि सीट-बॅक पॉकेट्स देण्यात आले आहेत. पुढील बाजूस पावर्ड आणि वेंटिलेटेड सीट्ससोबत अॅडजस्टेबल लंबर सपोर्ट मिळतो. यासोबतच कारमध्ये पॅनोरमिक सनरूफ देखील देण्यात आला आहे.
Renault च्या माहितीनुसार, नवीन Duster चा बूट स्पेस 700 लीटरपर्यंत आहे. पार्सल ट्रेच्या खाली स्क्वेअर-शेप बूट देण्यात आला असून, त्यात लाइट्स, हुक्स आणि स्पेअर व्हीलसाठी स्वतंत्र कॅव्हिटीसारखे उपयुक्त एलिमेंट्स आहेत. सेगमेंटमध्ये पावर्ड टेलगेट मिळणे हा मोठा प्लस पॉइंट मानला जातो.
परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
नवीन Duster मध्ये 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले असून, ते वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करते. हे सिस्टम Google OS वर चालते, ज्यामध्ये इन-बिल्ट नेव्हिगेशन आणि Google अॅप्स उपलब्ध आहेत. तसेच 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असून, तो शार्प रेजोल्यूशनसह नेव्हिगेशनसह विविध ड्रायव्हिंग माहिती दर्शवतो.
पूर्वीच्या भारतीय Duster च्या तुलनेत, नवीन Duster अधिक फीचर-लोडेड आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 48-कलर अॅम्बिएंट लाइटिंग, पावर्ड टेलगेट, पावर्ड आणि वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, लेदरेट अपहोल्स्ट्री, रियर AC वेंट्स, ऑटो हेडलॅम्प्स, रेन-सेंसिंग वायपर्स, क्रूझ कंट्रोल, Type-C USB पोर्ट्स, पॅनोरमिक सनरूफ, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री कॅमेरा, लेव्हल-2 ADAS, एअर प्युरिफायर यांसह अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
जरी अद्याप ड्रायव्हिंग अनुभव उपलब्ध नसला तरी, भारतासाठी निवडलेले पावरट्रेन मजबूत वाटतात. एंट्री व्हेरिएंट्समध्ये 100 PS चे 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. टॉप व्हेरिएंटमध्ये 163 PS चे 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि Strong Hybrid E-Tech 160 (सुमारे 160 PS, 1.4 kWh बॅटरी) पर्याय देण्यात येणार आहे, जो शहरातील ड्रायव्हिंगमध्ये 80% पर्यंत प्युअर इलेक्ट्रिक मोडमध्ये चालण्याचा दावा करतो.