प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लासिक लेजेंड्सच्या 'नोमॅड्स' राईडमध्ये देशभरातील २,००० हून अधिक रायडर्स सहभागी
‘नोमॅड्स फॉर युनिटी इन डायव्हर्सिटी’ या संकल्पनेनुसार जम्मू ते तमिळनाडू, गुजरात ते मणिपूर अशा विविध भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रदेशांमध्ये एकाच वेळी रायड्स आयोजित करण्यात आल्या. या राईड्समधून भारताच्या विशाल भूगोलाचे दर्शन घडले, तसेच मोटरसायकलिंगवरील समान प्रेमाने रायडर्स एकत्र आले.
परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
क्लासिक लीजेंड्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या उपक्रमात 2,000 हून अधिक रायडर्स सहभागी झाले होते. यामध्ये 20 पेक्षा अधिक स्वतंत्र रायडिंग कम्युनिटीज आणि 150 हून अधिक डीलरशिप-लीड रायडिंग ग्रुप्सचा समावेश होता. विविध वयोगट, व्यवसाय आणि रायडिंग शैली असलेले रायडर्स या राईड्सचा भाग होते. अनुभवी टूरर्सपासून ते प्रथमच लांब पल्ल्याची राईड करणाऱ्या नव्या रायडर्सपर्यंत सर्वांनी या प्रवासात सहभाग नोंदवला.
या उपक्रमासोबतच क्लासिक लीजेंड्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘नोमॅड्स: राईड ॲपज वन, राईड द लेगेसी’ हे कम्युनिटी पेज लाईव्ह केले आहे. या पेजच्या माध्यमातून रायडर्सना त्यांच्या जवळील जावा-येझदी-बीएसए रायडिंग क्लब्स सहज शोधता येणार असून, स्थानिक कम्युनिटीजशी कनेक्ट होणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे रायडर्सना अधिक वेळा ग्रुप राईड्समध्ये सहभागी होता येईल, तसेच आपली ‘ट्राइब’ शोधणे सोपे होणार आहे.
क्लासिक लीजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “मोटरसायकलिंगच्या मुळाशी स्वातंत्र्य शोधण्याची ओढ असते. आमचे परफॉर्मन्स क्लासिक्स याच विचारातून तयार करण्यात आले आहेत. मात्र, मोटरसायकलिंगची खरी ताकद म्हणजे रायडर्समधील आपलेपणाची भावना. डिजिटल ओव्हरलोडच्या या काळात नोमॅड्स हे कम्युनिटी पेज प्रत्येक रायडरला त्याच्या जवळची रायडिंग कम्युनिटी शोधण्यास मदत करेल. प्रजासत्ताक दिन हा एकत्र राईड करण्याचा दिवस आहे आणि या दिवशी जावा, येझदी आणि बीएसए रायडर्स एका घट्ट ट्राइबसारखे एकत्र येतात.”
नोमॅड्स पेजच्या लाँचव्यतिरिक्त, देशभरातील रायडर्सच्या कथा जावा, येझदी आणि बीएसए मोटरसायकल्सच्या सोशल मीडिया हँडल्सवर दिवसभर रिअल-टाईममध्ये शेअर करण्यात आल्या. यामुळे इतर रायडर्सनाही या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली.
प्रजासत्ताक दिनाच्या या रायड्स जावा, येझदी आणि बीएसए रायडिंग कम्युनिटीजसाठी एक वार्षिक परंपरा बनली असून, यावर्षी नोमॅड्स प्लॅटफॉर्मच्या शुभारंभामुळे या चळवळीला आणखी बळ मिळाले आहे. भविष्यातही क्लासिक लीजेंड्सकडून अशाच प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून रायडिंग कम्युनिटी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.






