Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लासिक लेजेंड्सच्या ‘नोमॅड्स’ राईडमध्ये देशभरातील २,००० हून अधिक रायडर्स सहभागी

प्रजासत्ताक दिनानिमित्त 'नोमॅड्स' या एकत्रित रायडिंग कलेक्टिव्हखाली जावा, येझदी आणि बीएसए रायडर्सना एकत्र आले होते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 30, 2026 | 03:58 PM
प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लासिक लेजेंड्सच्या 'नोमॅड्स' राईडमध्ये देशभरातील २,००० हून अधिक रायडर्स सहभागी

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लासिक लेजेंड्सच्या 'नोमॅड्स' राईडमध्ये देशभरातील २,००० हून अधिक रायडर्स सहभागी

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष उपक्रम
  • जावा, येझदी आणि बीएसए रायडर्स आले एकत्र
  • ‘नोमॅड्स’ या एकत्रित रायडिंग कलेक्टिव्हच्या माध्यमातून रायडर्स एकत्र
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर क्लासिक लीजेंड्स या कंपनीने ‘नोमॅड्स’ या एकत्रित रायडिंग कलेक्टिव्हच्या माध्यमातून जावा, येझदी आणि बीएसए मोटरसायकल ब्रँड्सच्या रायडर्सना देशभर एकत्र आणले. मोटरसायकलिंगप्रमाणेच भारतही विविधतेतून निर्माण होणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे, या सामायिक विश्वासातून प्रेरित होऊन हा उपक्रम राबवण्यात आला.

‘नोमॅड्स फॉर युनिटी इन डायव्हर्सिटी’ या संकल्पनेनुसार जम्मू ते तमिळनाडू, गुजरात ते मणिपूर अशा विविध भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रदेशांमध्ये एकाच वेळी रायड्स आयोजित करण्यात आल्या. या राईड्समधून भारताच्या विशाल भूगोलाचे दर्शन घडले, तसेच मोटरसायकलिंगवरील समान प्रेमाने रायडर्स एकत्र आले.

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

क्लासिक लीजेंड्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या उपक्रमात 2,000 हून अधिक रायडर्स सहभागी झाले होते. यामध्ये 20 पेक्षा अधिक स्वतंत्र रायडिंग कम्युनिटीज आणि 150 हून अधिक डीलरशिप-लीड रायडिंग ग्रुप्सचा समावेश होता. विविध वयोगट, व्यवसाय आणि रायडिंग शैली असलेले रायडर्स या राईड्सचा भाग होते. अनुभवी टूरर्सपासून ते प्रथमच लांब पल्ल्याची राईड करणाऱ्या नव्या रायडर्सपर्यंत सर्वांनी या प्रवासात सहभाग नोंदवला.

या उपक्रमासोबतच क्लासिक लीजेंड्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘नोमॅड्स: राईड ॲपज वन, राईड द लेगेसी’ हे कम्युनिटी पेज लाईव्ह केले आहे. या पेजच्या माध्यमातून रायडर्सना त्यांच्या जवळील जावा-येझदी-बीएसए रायडिंग क्लब्स सहज शोधता येणार असून, स्थानिक कम्युनिटीजशी कनेक्ट होणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे रायडर्सना अधिक वेळा ग्रुप राईड्समध्ये सहभागी होता येईल, तसेच आपली ‘ट्राइब’ शोधणे सोपे होणार आहे.

क्लासिक लीजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “मोटरसायकलिंगच्या मुळाशी स्वातंत्र्य शोधण्याची ओढ असते. आमचे परफॉर्मन्स क्लासिक्स याच विचारातून तयार करण्यात आले आहेत. मात्र, मोटरसायकलिंगची खरी ताकद म्हणजे रायडर्समधील आपलेपणाची भावना. डिजिटल ओव्हरलोडच्या या काळात नोमॅड्स हे कम्युनिटी पेज प्रत्येक रायडरला त्याच्या जवळची रायडिंग कम्युनिटी शोधण्यास मदत करेल. प्रजासत्ताक दिन हा एकत्र राईड करण्याचा दिवस आहे आणि या दिवशी जावा, येझदी आणि बीएसए रायडर्स एका घट्ट ट्राइबसारखे एकत्र येतात.”

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

नोमॅड्स पेजच्या लाँचव्यतिरिक्त, देशभरातील रायडर्सच्या कथा जावा, येझदी आणि बीएसए मोटरसायकल्सच्या सोशल मीडिया हँडल्सवर दिवसभर रिअल-टाईममध्ये शेअर करण्यात आल्या. यामुळे इतर रायडर्सनाही या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली.

प्रजासत्ताक दिनाच्या या रायड्स जावा, येझदी आणि बीएसए रायडिंग कम्युनिटीजसाठी एक वार्षिक परंपरा बनली असून, यावर्षी नोमॅड्स प्लॅटफॉर्मच्या शुभारंभामुळे या चळवळीला आणखी बळ मिळाले आहे. भविष्यातही क्लासिक लीजेंड्सकडून अशाच प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून रायडिंग कम्युनिटी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Web Title: Over 2000 riders from across the country participate in classic legends nomads ride on republic day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
1

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ
2

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
3

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा
4

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.