फोटो सौजन्य: iStock
दिवाळी म्हंटलं की खरेदी आलीच. मग ते नवीन कपडे असो की नवीन घर. मात्र, दिवाळीत अनेक जण त्यांची ड्रीम बाईक सुद्धा खरेदी करत असतात. आता ड्रीम बाईक म्हंटलं की अनेकांना Royal Enfield च्या बाईक खरेदी करण्याची इच्छा असते. तरुणांमध्ये तर कंपनीच्या बाईक विशेष लोकप्रिय आहेत. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या Diwali 2025 मध्ये नवीन रॉयल एन्फिल्ड बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
आज आपण रॉयल एनफील्डच्या 350 सीसी जे-प्लॅटफॉर्म बाईक्सबद्दल जाणून घेऊयात. यामध्ये Classic 350, Hunter 350, Meteor 350, Bullet 350 आणि Goan Classic 350 यांचा समावेश आहे. या सर्व बाईक अनेक उत्कृष्ट फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह येतात. चला या बाईक्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपयांपासून सुरू होते. Hunter 350 ही Royal Enfield कडील सर्वात हलकी आणि परवडणारी 350cc बाईक आहे. शहरातील हलक्या ट्रॅफिकमध्ये ही बाईक हाताळणे अतिशय सोपे आहे. 181 किलो वजन आणि 790 मिमी सीट उंचीमुळे ती अत्यंत सुलभ व नियंत्रित वाटते. Slip-and-assist क्लच, सुधारित सस्पेंशन आणि अधिक आरामदायी सीट फोममुळे रायडिंगचा अनुभव अधिक सुखद बनतो.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.91 लाख रुपयांपासून सुरू होते. 765 मिमी सीट उंची आणि पुढे बसवलेले फूटपॅग्स यामुळे ही बाईक लॉंग राइडसाठी अत्यंत आरामदायी ठरते. सर्व व्हेरिएंटमध्ये LED हेडलाइट्स, Tripper नेव्हिगेशन आणि Slip-and-assist क्लच अशी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. वजन 191 किलो असले तरी तिची राइडिंग सहज आणि स्थिर राहते.
या बाइकची किंमत 1.62 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही क्लासिक 350 सारखीच राइड अनुभव देते, परंतु हाय हँडलबार आणि अतिरिक्त सीट पॅडिंगमुळे ती थोडी वेगळी बनते. बेस व्हेरिएंटमध्ये सिंगल-चॅनेल एबीएस आणि क्रोम डिटेलिंग आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस आणि ब्लॅक-आउट इंजिन आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.81 लाख रुपयांपासून सुरू होते. Classic 350 हा Royal Enfield चा सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. ही बाईक आरामदायी आणि न्यूट्रल रायडिंग पोझिशन देते. बेस व्हेरिएंट सिंगल-चॅनेल ABS सह येतो, तर हाय व्हेरिएंटमध्ये ड्युअल-चॅनेल ABS आणि Tripper नेव्हिगेशनची सुविधा दिली आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.18 लाख रुपयांपासून सुरू होते. Goan Classic 350 ही या लाइनअपमधील सर्वात वेगळी आणि प्रीमियम बाईक आहे. बॉबर-इंस्पायर्ड डिझाइन, 750 मिमी सीट उंची, पुढे बसवलेले फूटपॅग्स आणि 16-इंच रिअर व्हील यामुळे ती खास आणि आकर्षक दिसते.