'या' 5 कार म्हणजे ऑटो मार्केटच्या शान! (फोटो सौजन्य: iStock)
कार खरेदी करताना ग्राहक नेहमीच त्याच्या किमती आणि मायलेजकडे जास्त लक्ष देत असतात. ग्राहकांची हीच डिमांड लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या कार ऑफर करत असतात. मात्र, कारचे पर्याय जास्त असल्याकारणाने कोणती कार आपल्यासाठी परफेक्ट असेल हा प्रश्न नेहमीच ग्राहकांच्या मनात येत असतो.
जर कार खरेदी करताना तुम्ही मायलेजला सर्वात पहिले प्राधान्य देत असाल, तर ही लिस्ट तुमच्यासाठी आहे. आजही भारतीय कार बाजारात सर्वात मोठी मागणी पेट्रोलवर चालणाऱ्या कारला असते. Maruti Suzuki ने याबाबतीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. टॉप पाचपैकी पाचही कार मारुतीच्याच आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या पेट्रोल कार सर्वाधिक मायलेज देतात.
AMT – 26.68 kmpl / MT – 25.24 kmpl
मारुती सेलेरियो ही सध्या भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी पेट्रोल कार आहे. यात 1.0-लिटर K10 पेट्रोल इंजिन मिळते, जे 67hp पॉवर निर्माण करते. हलक्या हिअरटेक्ट (Heartect) प्लॅटफॉर्मवर आधारित ही कार सोपी ड्रायव्हिंग आणि कमी खर्चात उत्तम पर्याय ठरते.
AMT – 25.75 kmpl / MT – 24.80 kmpl
नव्या जनरेशन स्विफ्टमध्ये स्टाईलसोबत एफिशियन्सीवरही भर दिला आहे. यात 1.2-लिटर 3-सिलेंडर Z-सीरीज इंजिन मिळते. हलकी बॉडी आणि हाय-टेक इंजिन यामुळे ही कार उत्कृष्ट मायलेज देते.
Maruti Victoris बुक केलीत, आता डिलिव्हरी कधी? ‘ही’ तारीख लक्षात ठेवा
AMT – 25.71 kmpl / MT – 24.79 kmpl
जर तुम्हाला सेडान आवडत असेल, तर डिझायर हा उत्तम पर्याय आहे. ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी पेट्रोल सेडान आहे. 82hp Z-सीरीज इंजिन, कम्फर्ट आणि 5-स्टार सेफ्टीसह बेस्ट-इन-क्लास मायलेज यामुळे ही कार खास ठरते.
AMT – 25.30 kmpl / MT – 24.76 kmpl
1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येणारी ही मिनी-SUV टॉल-बॉय डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. याचा AMT व्हर्जन अधिक एफिशियंट मानला जातो. मात्र, अल्टो K10 प्रमाणे यात स्टँडर्ड 6 एअरबॅग्स उपलब्ध नाहीत.
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…
AMT – 25.29 kmpl / 1.0 MT – 24.35 kmpl
स्पेस आणि प्रॅक्टिकॅलिटीमुळे वॅगन-आर नेहमीच लोकप्रिय ठरली आहे. यात मिळणारे 1.0-लिटर पेट्रोल इंजिन अत्यंत किफायतशीर आहे. तसेच 1.2-लिटर इंजिनचा पर्यायही आहे, मात्र त्याचे मायलेज तुलनेने कमी (23.9 kmpl) आहे.