फोटो सौजन्य: @MSArenaOfficial/ X.com
भारतीय ऑटो बाजारात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या भारतात एसयूव्ही कार ऑफर करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील भारतीय रस्त्यांवर धावत आहेत.
नुकतेच देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने भारतात नवीन एसयूव्ही ऑफर केली आहे. कंपनीने Maruti Victoris एसयूव्ही लाँच केली आहे. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करून घरी आणण्याचा विचार करत असाल, तर या कारची डिलिव्हरी कधी सुरू होईल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
मारुतीने अलीकडेच Mid Size एसयूव्ही व्हिक्टोरिस लाँच केली आहे. या एसयूव्हीसाठी बुकिंग लगेचच सुरू झाली आहे. बुकिंग केल्यानंतर, या कारची डिलिव्हरी 22 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असेल असे कंपनीने सांगितले आहे.
कमी किमतीत सुरक्षितता; Studds ने आणला महिला-पुरुषांसाठी ढासू हेल्मेट
कंपनीकडून ही एसयूव्ही भारतात 10.50 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 19.98 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
मारुतीच्या विक्टोरिस एसयूव्हीमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रिअर टेललाइट्स, शार्क फिन अँटेना, 26.03 सेमीचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडरबॉडी सीएनजी किट, डॉल्बी ॲटमॉस साऊंड सिस्टीम, जेस्चर कंट्रोल टेलगेट, ॲम्बियंट लाइटिंग, अलेक्सा ऑटो व्हॉइस असिस्टंट, 35 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स, पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स असे फीचर्स उपलब्ध आहेत. इंटिरिअरसाठी काळा, राखाडी आणि सिल्व्हर रंगांचा कॉम्बिनेशन करण्यात आला आहे.
Royal Enfield Bikes खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी! GST 2.0 मुळे दरात झाला मोठा फरक
मारुतीची ही नवीन एसयूव्ही 1.5-लिटरचे पॉवरफुल इंजिन वापरते, जे 250 एचपी आणि 100 एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार सहा-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. एसयूव्हीमध्ये मजबूत हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि सीएनजी पर्याय देखील आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, या नव्या एसयूव्हीला भारत NCAP आणि ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. तसेच 6 एअरबॅग, ABS, EBD, ISOFIX चाईल्ड अँकरज यांसारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत.