गावच्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा 'या' Cars धावतील एकदम मख्खनसारख्या!
कार खरेदी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. एकदा का कार खरेदी झाली की मग याच कारमधून आपली ये-जा होत असते. कधी कधी कारचा वापर हा लॉंग ट्रिप आणि गावी जाण्यासाठी सुद्धा होतो. त्यातही गावचे रस्ते खराब असतील तर वाहन चालकांना हमखास टेन्शन येतं.
शहरी भागासह आता ग्रामीण भागात, कार देखील एक गरज बनली आहेत. शेतजमीन, खडबडीत रस्ते, चिखलाचे रस्ते आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, एक मजबूत आणि उत्तम कार आवश्यक असते. जर तुम्ही देखील अशी कार शोधात असाल जी गावच्या रस्त्यांवर उत्तम रित्या चालेल तर मग आज आपण बेस्ट तीन कारबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय पाऊल पडते पुढे! Japan च्या Auto Expo मध्ये Maruti च्या ‘या’ Made In India कार होणार सादर
मारुती सुझुकी अल्टो K10 ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि परवडणारी कार आहे. 3.69 लाख (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही कार ग्रामीण रस्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्याचे 1.0-लिटर पेट्रोल इंजिन 67 पीएस पॉवर निर्माण करते. त्याचे हलके वजन आणि कॉम्पॅक्ट आकार अरुंद गल्ल्या आणि शेतातील रस्त्यांवर चालणे सोपे करते. या कारमध्ये आता 6 एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस आणि मागील पार्किंग सेन्सर्स सेफ्टी फीचर्ससह स्टॅंडर्ड स्वरूपात येते. जर तुम्ही बजेटमध्ये असाल आणि दैनंदिन कामांसाठी विश्वासार्ह छोटी कार शोधत असाल, तर अल्टो K10 ही एक उत्तम निवड आहे.
मारुती वॅगन आर ही भारतातील सर्वात विश्वासार्ह फॅमिली कारपैकी एक मानली जाते. 4.99 लाख (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही कार ग्रामीण भागात याच्या मजबूतपणा आणि आरामदायी ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. याचे उंच डिझाइन आणि 165 मिमी ग्राउंड क्लिअरन्स ही खडबडीत ग्रामीण रस्त्यांसाठी आदर्श बनवते. वॅगन आरची सीएनजी व्हर्जन प्रभावी 33.47 किमी/किलोग्रॅम मायलेज देते, ज्यामुळे इंधन कार्यक्षमतेच्या बाबतीत ती सर्वोत्तम बनते.
पुन्हा दिसली Tata Sierra; मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती, केव्हा होणार लाँच?
गावाच्या रस्त्यांची चर्चा होत आहे Mahindra Bolero चे नाव घेतले जाणार नाही असे शक्यच नाही. 9.79 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होणारी ही SUV तिच्या मजबूत बांधणीसाठी आणि रफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाते. लॅडर-ऑन-फ्रेम चेसिस, 180 मिमी ग्राउंड क्लीअरन्स आणि रिअर-व्हील ड्राइव्ह सिस्टम यामुळे चिखल किंवा उंचसखल रस्त्यांवर सहज चालवता येते.
2025 मध्ये लाँच झालेल्या Bolero Bold Edition मध्ये डिझाइन आणि इंटिरिअर या दोन्ही बाबतीत सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे ही SUV आता पूर्वीपेक्षा अधिक मॉडर्न आणि स्टायलिश दिसते.