(फोटो सौजन्य-AI एआय)
बजाज चेतक C2501
बजाज चेतक C2501 मध्ये 2.5kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये 113 किमीपर्यंत IDC रेंज देत असल्याचा दावा आहे. स्कूटरची टॉप-स्पीड 60kmph आहे. 750W ऑफ-बोर्ड चार्जरच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास 45 मिनिटे लागतात. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹1,04,802 आहे. शहरात रोजच्या वापरासाठी कॉम्पॅक्ट साइज आणि साध्या वापरामुळे हा एक प्रॅक्टिकल ऑप्शन ठरू शकतो.
बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
हिरो Vida VX2 Go
हिरो Vida VX2 Go मध्ये 2.2kWh आणि 3.4kWh असे दोन बॅटरी ऑप्शन मिळतात. त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ₹99,490 आणि ₹1,20,990 आहे. 2.2kWh बॅटरीसह 93 किमी, तर 3.4kWh बॅटरीसह 146 किमी ARAI रेंज मिळते. याशिवाय Fixed Battery व्हेरिएंटची किंमत ₹1.13 लाखांपासून सुरू होते. स्कूटरमध्ये 33.2 लिटर अंडरसीट स्टोरेज, 4.3-इंच डिजिटल कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखे फीचर्स मिळतात.
बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
ओला S1 Z
बजेटमध्ये जास्त रेंज हवी असेल तर ओला S1 Z आकर्षक ठरतो. यात 3.1kWh आणि 5.1kWh बॅटरी ऑप्शन मिळतात. त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ₹79,999 आणि ₹99,999 आहे. 3.1kWh बॅटरी 179 किमी, तर 5.1kWh बॅटरी 301 किमी IDC रेंज देत असल्याचा दावा आहे. यामध्ये 34 लिटर स्टोरेज, ईजी पार्क, रिव्हर्स मोड, नॉर्मल आणि इको राइडिंग मोड, CBS, फ्रंट टेलिस्कोपिक आणि रियर ट्विन-शॉक सस्पेंशन मिळते. त्यामुळे जास्त रेंज आणि कमी बजेटचा कॉम्बिनेशन शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय विशेष आकर्षक आहे.






