
9mm आणि .44 मॅग्नम गोळ्यांपासून संरक्षण
BMW कॉन्सेप्ट 7 प्रोटेक्शन नवीन BayB सुरक्षा मानकानुसार तयार करण्यात आली आहे. या मानकांतर्गत निवडक 9×19 mm आणि .44 मॅग्नम पिस्तुलांच्या गोळ्यांपासून संरक्षण देण्यावर भर आहे. कारच्या दरवाजांमध्ये मजबूत स्टील आणि फायबर-रिइन्फोर्स्ड कंपोझिट मटेरियल वापरण्यात आले आहे. खिडक्यांसाठी जाड बॅलिस्टिक ग्लास देण्यात आला असून दरवाजे, काचा आणि बॉडी पॅनल्स यांच्यातील जोडांनाही जास्त सुरक्षा देण्यात आली आहे. छताखाली आणि मागच्या केबिनच्या भिंतीतही मजबूत सेफ्टी लेयर आहेत.
603 hp पॉवर आणि 800 Nm टॉर्क
या आर्मर्ड कारमध्ये BMW M760e xDrive चे प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन वापरण्यात आले आहे. यात 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड 6-सिलिंडर पेट्रोल इंजिन 420 hp पॉवर देते, तर इलेक्ट्रिक मोटर 194 hp पॉवर निर्माण करते. दोन्हींची एकत्रित पॉवर 603 hp आणि टॉर्क 800 Nm आहे. 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि xDrive ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टममुळे चारही चाकांपर्यंत पॉवर पोहोचते. आर्मरमुळे वाढलेल्या वजनानुसार सस्पेन्शन आणि ब्रेक्समध्येही बदल करण्यात आले आहेत.
BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!
केबिनमध्येही हायटेक सुरक्षा
या कारमध्ये इंटरकॉम सिस्टम देण्यात आली आहे. त्यामुळे दरवाजे किंवा खिडक्या उघडण्याची गरज न पडता बाहेरील व्यक्तींशी संवाद साधता येतो. संभाव्य हल्ल्याच्या परिस्थितीत व्हिज्युअल आणि ऑडिओ अलर्ट देणारी अटॅक अलार्म सिस्टमही आहे. सुरक्षेसाठी बाजूच्या खिडक्या उघडण्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. आतमध्ये मेरिनो लेदर, अल्कँटारा ट्रिम, डिजिटल इंटिरियर मिरर आणि इलेक्ट्रॉनिक सनब्लाइंड्स यांसारखी लक्झरी वैशिष्ट्ये आहेत.
मागच्या प्रवाशांसाठी खास सुविधा
मागच्या सीटवर बसणाऱ्यांसाठी फोल्डेबल टेबल, वायरलेस चार्जिंग ट्रे आणि इंटिग्रेटेड कूल बॉक्स यांसारखे पर्यायही देण्यात आले आहेत. बीएमडब्ल्यूने या कॉन्सेप्टच्या सादरीकरणातून लक्झरी आणि सुरक्षा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ही संकल्पना निवडक युरोपीय मार्केटसाठी विचाराधीन आहे. भारतातील लाँच, किंमत आणि विक्रीबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.
BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका
प्रश्न 1: बीएमडब्ल्यू कॉन्सेप्ट 7 प्रोटेक्शन किती पॉवर निर्माण करते?
उत्तर: या कारचे प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन 603 hp पॉवर आणि 800 Nm टॉर्क निर्माण करते.
प्रश्न 2: बीएमडब्ल्यू कॉन्सेप्ट 7 प्रोटेक्शन कोणत्या प्रकारचे संरक्षण देते?
उत्तर: ही कार BayB मानकानुसार निवडक 9×19 mm आणि .44 मॅग्नम पिस्तुलांच्या गोळ्यांपासून संरक्षणासाठी तयार करण्यात आली आहे.
प्रश्न 3: ही कार भारतात लाँच होणार आहे का?
उत्तर: बीएमडब्ल्यूने भारतातील लाँच किंवा किंमतीबाबत माहिती जाहीर केलेली नाही. सध्या ही संकल्पना निवडक युरोपीय मार्केटसाठी विचाराधीन आहे.