Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यूची मोठी डील! भारतात येणार 2 नवीन इलेक्ट्रिक कार, महाराष्ट्रालाही मिळणार फायदा?

फोक्सवॅगन ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप संभाव्य संयुक्त उपक्रमातून 2 नवीन इलेक्ट्रिक कार भारतात तयार करण्याच्या योजनेवर चर्चा करत आहेत. स्थानिक असेंब्ली, 51:49 हिस्सेदारीची प्रस्तावित रचना आणि 2027 च्या मध्यापूर्वी कराराची शक्यता या घडामोडींमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष या भागीदारीकडे लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 15, 2026 | 05:03 PM
फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यूची मोठी डील! भारतात येणार 2 नवीन इलेक्ट्रिक कार, महाराष्ट्रालाही मिळणार फायदा?
Follow Us
Follow Us:
  • फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू ग्रुप भारतात 2 नवीन इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी संभाव्य भागीदारीवर चर्चा करत आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर किंवा हलोल येथील प्लांटमध्ये नवीन इलेक्ट्रिक कारचे प्रोडक्शन होण्याची शक्यता आहे.
  • प्रस्तावित करारात जेएसडब्ल्यूकडे 51% आणि फोक्सवॅगनकडे 49% हिस्सेदारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतातील इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. जर्मनीची फोक्सवॅगन ग्रुप आणि भारतातील जेएसडब्ल्यू ग्रुप यांच्यात पार्टनरशिपवर चर्चा सुरू आहे. या पार्टनरशिपतून पुढील 2 वर्षांत भारतात 2 नवीन इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, या कारचे प्रोडक्शन भारतातच करण्यासाठी स्थानिक मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कंपनीला स्वतंत्र कारखाना उभारण्याची गरज कमी होऊ शकते.

महाराष्ट्रातील प्लांटमध्ये होऊ शकते प्रोडक्शन

या संभाव्य भागीदारीसाठी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र आणि हलोल, गुजरात येथील जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाच्या प्लांटचा विचार केला जात असल्याचे वृत्त आहे. यापैकी कोणत्या ठिकाणी कारचे प्रोडक्शन होणार, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. लोकल असेंब्लीमुळे प्रोडक्शन खर्च नियंत्रित ठेवणे आणि भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार कार तयार करणे शक्य होऊ शकते.

जेएसडब्ल्यूकडे 51% हिस्सेदारी जाण्याची शक्यता

प्रस्तावित संयुक्त उपक्रमात जेएसडब्ल्यू ग्रुपकडे 51% हिस्सेदारी, तर फोक्सवॅगन ग्रुपकडे 49% हिस्सेदारी असण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर 2026 मध्ये नॉन-बाइंडिंग सामंजस्य करार केला असून, सध्या विशेष चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. या पार्टनरशिपचा अंतिम करार 2027 च्या मध्यापूर्वी होऊ शकतो, पण तो चर्चेच्या निष्कर्षावर अवलंबून असेल.

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स

स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या EV योजनांना गती?

या सहकार्यामुळे स्कोडा आणि फोक्सवॅगनला भारतीय मार्केटमध्ये स्थानिक पातळीवर तयार केलेल्या इलेक्ट्रिक कार सादर करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, स्थानिक सुटे भाग खरेदी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि डीलरशिप नेटवर्क वाढवण्यावरही भर दिला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात नवीन मॉडेल्स आणण्याचा मार्ग चांगला होण्याची शक्यता आहे.

2030 पर्यंत नफ्यावर लक्ष

फोक्सवॅगन ग्रुपने 2030 पर्यंत आपल्या भारतीय व्यवसायाची नफाक्षमता सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी स्थानिक पातळीवरील सुटे भागांचा वापर, जास्त प्रोडक्शन आणि नवीन कार सादर करणे महत्त्वाचे ठरू शकते. पण प्रस्तावित इलेक्ट्रिक कारची नावे, किंमत, रेंज आणि लाँचची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

एकंदरीत, ही भागीदारी प्रत्यक्षात आल्यास भारतातील इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये स्पर्धा वाढू शकते. विशेषतः महाराष्ट्रातील उत्पादन सुविधेची निवड झाल्यास राज्याच्या ऑटोमोबाईल उद्योगासाठीही ही महत्त्वाची घडामोड ठरू शकते.

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: फोक्सवॅगन आणि जेएसडब्ल्यू भारतात किती नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहेत?

उत्तर: वृत्तानुसार, संभाव्य भागीदारीतून पुढील 2 वर्षांत 2 नवीन इलेक्ट्रिक कार भारतात आणण्याची योजना आहे.

प्रश्न 2: या इलेक्ट्रिक कारचे प्रोडक्शन महाराष्ट्रात होणार का?

उत्तर: छत्रपती संभाजीनगर येथील प्लांटचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. पण प्रोडक्शनचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.

प्रश्न 3: फोक्सवॅगन-जेएसडब्ल्यू भागीदारीत कोणाची किती हिस्सेदारी असेल?

उत्तर: प्रस्तावित रचनेनुसार जेएसडब्ल्यू ग्रुपकडे 51% आणि फोक्सवॅगन ग्रुपकडे 49% हिस्सेदारी असण्याची शक्यता आहे. अंतिम करार अद्याप झालेला नाही.

Web Title: Volkswagen jsw electric cars india partnership maharashtra auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • automobile
  • Volkswagen

संबंधित बातम्या

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
1

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

महिंद्रा XUV 3XO CNG लाँच! किंमत 9.99 लाखांपासून, मिळणार 24.7 किमी/किलो मायलेज
2

महिंद्रा XUV 3XO CNG लाँच! किंमत 9.99 लाखांपासून, मिळणार 24.7 किमी/किलो मायलेज

बजेट 1 लाखांचं? मग ही इलेक्ट्रिक स्कूटर पाहाच! e-SPRINTO G1 मधील हे भन्नाट फीचर्स जाणून घ्या
3

बजेट 1 लाखांचं? मग ही इलेक्ट्रिक स्कूटर पाहाच! e-SPRINTO G1 मधील हे भन्नाट फीचर्स जाणून घ्या

Yezdi Motorcycles Festive : आता 0 डाऊन पेमेंटवर मिळणार बाईक… Jawa, Yezdi आणि BSA प्रेमींसाठी खूशखबर! जाऊन घ्या पर्याय
4

Yezdi Motorcycles Festive : आता 0 डाऊन पेमेंटवर मिळणार बाईक… Jawa, Yezdi आणि BSA प्रेमींसाठी खूशखबर! जाऊन घ्या पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.