Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 21 मिनिटांत चार्ज! BMW ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार घरालाही देऊ शकते पॉवर सप्लाय

BMW च्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीने अशी एक भन्नाट कार लाँच केली आहे, जी अवघ्या 21 मिनिटात चार्ज होते.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 02, 2026 | 10:01 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • जगभरात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत वाढ
  • नुकतेच BMW iX3 लाँग व्हीलबेस व्हर्जन सादर
  • फक्त 21 मिनिटात होते चार्ज
BMW ने आपली नवी BMW iX3 इलेक्ट्रिक SUV चा लाँग व्हीलबेस (LWB) व्हर्जन सादर केला आहे. ही कार खास करून भारत आणि चीनसारख्या बाजारांसाठी तयार करण्यात आली आहे, जिथे मागील सीटवर अधिक जागा असलेल्या गाड्यांना जास्त पसंती दिली जाते. या नव्या iX3 चे पहिले दर्शन पुढील महिन्यात होणाऱ्या Beijing International Auto Show मध्ये होणार आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार फक्त 21 मिनिटांत चार्ज होऊ शकते आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 800 किलोमीटरपर्यंत धावू शकते. इतकी मोठी रेंज असल्यामुळे वारंवार चार्जिंगची गरज कमी होते. विशेष म्हणजे, ही कार ‘व्हेईकल टू होम’ फीचरसोबत येते, ज्यामुळे गरज पडल्यास घरालाही वीज पुरवठा करता येतो.

Renault च्या ‘या’ 2 Cars ची जादू कायम! मार्च 2026 च्या विक्रीत 77 टक्क्यांची विक्रमी वाढ, विकल्या हजारो गाड्या

जास्त जागा आणि आरामदायी प्रवास

नवीन BMW iX3 मध्ये व्हीलबेस 108 मिमीने वाढवण्यात आला असून तो आता 3005 मिमी झाला आहे. याशिवाय कारची एकूण लांबी सुमारे 4.9 मीटरपर्यंत वाढली आहे. यामुळे केबिनमध्ये अधिक जागा उपलब्ध होते, विशेषतः मागील सीटवरील प्रवाशांसाठी लेगरूम वाढला आहे. त्यामुळे लांब प्रवास अधिक आरामदायी होतो आणि कुटुंबासाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते.

डिझाइन आणि सुरक्षिततेवर भर

या नव्या मॉडेलमध्ये BMW ने डिझाइनमध्ये काही बदल करताना सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. चीनमध्ये रिट्रॅक्टेबल डोअर हँडल्सवर निर्बंध असल्याने या कारमध्ये पारंपरिक बाहेर ओढता येणारे हँडल्स दिले आहेत. हा बदल लहान वाटला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतात येणाऱ्या मॉडेलमध्येही अशाच डिझाइनची शक्यता आहे. एकूणच कारचा लूक आधुनिक आणि प्रीमियम आहे.

VinFast भारतात आपली मुळे घट्ट करण्यासाठी सज्ज! नवीन E Scooter लाँच करण्याच्या तयारीत

प्रगत तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्स

BMW iX3 मध्ये अत्याधुनिक बॅटरी आणि सिस्टीम देण्यात आली आहे, जी जलद चार्जिंगसह उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. 21 मिनिटांत चार्ज होण्याची क्षमता ही या कारची मोठी जमेची बाजू आहे. ‘व्हेईकल टू होम’ फीचरमुळे ही कार केवळ प्रवासासाठीच नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत घरासाठी वीजपुरवठा करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

Web Title: Bmw ix3 long wheelbase version launch instant charge in 21 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • electric car

संबंधित बातम्या

Renault च्या ‘या’ 2 Cars ची जादू कायम! मार्च 2026 च्या विक्रीत 77 टक्क्यांची विक्रमी वाढ, विकल्या हजारो गाड्या
1

Renault च्या ‘या’ 2 Cars ची जादू कायम! मार्च 2026 च्या विक्रीत 77 टक्क्यांची विक्रमी वाढ, विकल्या हजारो गाड्या

VinFast भारतात आपली मुळे घट्ट करण्यासाठी सज्ज! नवीन E Scooter लाँच करण्याच्या तयारीत
2

VinFast भारतात आपली मुळे घट्ट करण्यासाठी सज्ज! नवीन E Scooter लाँच करण्याच्या तयारीत

भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर! जाणून घ्या फीचर्स आणि पॉवर
3

भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर! जाणून घ्या फीचर्स आणि पॉवर

आम्हीच इथले बादशाह!’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय, एका वर्षात 50,000 वाहने सोल्ड आऊट
4

आम्हीच इथले बादशाह!’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय, एका वर्षात 50,000 वाहने सोल्ड आऊट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.