बीएमडब्ल्यू इंडिया आपल्या एसयूव्ही पोर्टफोलिओला बळकट करण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन X1 लाँग व्हीलबेस आवृत्ती लाँच करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असलेली ही कार भारतीय बाजारात येणारी पहिली लाँग-व्हीलबेस X1 ठरत आहे. कारची एकूण डिझाईन परिचित राहिली असली, तरी तिची वाढलेली लांबी प्रवाशांच्या आरामासाठी आणि अधिक जागेसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
आकार आणि परिमाणे
नवीन BMW X1 LWB ची लांबी ४,६१६ मिमी, रुंदी १,८४५ मिमी आणि उंची १,६४१ मिमी आहे, तर तिचा व्हीलबेस २,८०२ मिमी आहे. भारतात सध्या विकल्या जाणाऱ्या स्टँडर्ड X1 च्या तुलनेत नवीन मॉडेल ११६ मिमीने लांब आहे आणि त्याच्या व्हीलबेसमध्ये ११० मिमीची वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांचा आराम वाढवण्यासाठी बीएमडब्ल्यूने मागील सीट २७ मिमीने उंच केली आहे आणि मागील हेडरेस्ट ३७ मिमीने रुंद केले आहेत.
2027 Mercedes-Maybach GLS 680: दमदार V8 इंजिन आणि नवीन इंटिरिअरसह सादर! एका क्लिकवर घ्या पाहून
परफॉर्मन्स आणि इंजिन
या कारची बूट स्पेस वाढवून ५४० लिटर करण्यात आली असून ती १८ इंचांच्या अलॉय व्हील्सवर चालते. यात ५४ लिटरची इंधन टाकी आहे. यात बीएमडब्ल्यूचे २.०-लिटर टर्बो फोर-सिलिंडर पेट्रोल इंजिन असण्याची अपेक्षा आहे, जे २०४ एचपी पॉवर आणि ३०० एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले असून ते फक्त फ्रंट-व्हील ड्राईव्हला पॉवर पुरवते. ही एसयूव्ही अवघ्या ७.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड सुमारे २३० किमी प्रति तास आहे. कंपनी भविष्यात या कारचे डिझेल मॉडेल देखील आणू शकते.
डिझाईन आणि फीचर्स
कारच्या बाह्य भागात बीएमडब्ल्यूची नवीन डिझाईन लँग्वेज पाहायला मिळते. पुढील बाजूस मोठी किडनी ग्रिल, अडाप्टिव्ह एलईडी हेडलँप्स आणि एलईडी डीआरएल दिले आहेत. स्कलप्टेड बंपर, सॅटिन अल्युमिनियम रुफ रेल्स, फ्लश-स्टाईल डोअर हँडल्स, पॅनोरॅमिक ग्लास रुफ, शार्क-फिन अँटेना, रियर स्पॉयलर आणि एलईडी टेल लँप्स यांसारखे घटक यात समाविष्ट आहेत.
केबिनच्या आत, डॅशबोर्डची रचना नियमित X1 सारखीच आहे. यात १०.२५ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १०.७ इंचाची कर्व्ह्ड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, जी BMW ऑपरेटिंग सिस्टम ९ वर चालते. वायरलेस ऍपल कारप्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, Harman Kardon प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, वायरलेस फोन चार्जिंग, पॉवर्ड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ॲम्बियंट लायटिंग, डिजिटल की, पॉवर्ड टेलगेट आणि पॅनोरॅमिक ग्लास रुफ यांसारख्या आधुनिक सुविधा यात मिळतील. याशिवाय व्हॉइस असिस्टंट, OTA अपडेट्स आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्टन्सचाही समावेश आहे.
सुरक्षा
सुरक्षिततेच्या बाबतीत, कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ABS सह EBD, डायनॅमिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा आणि ISOFIX चाईल्ड-सीट माऊंट्स दिले जाण्याची अपेक्षा आहे. व्हेरियंटनुसार यात निवडक ADAS फीचर्स देखील मिळतील. भारतीय बाजारात लाँच झाल्यावर ही एसयूव्ही Mercedes-Benz GLA, Audi Q3 आणि Volvo XC40 या वाहनांशी स्पर्धा करेल.






