मर्सिडीज-मेबॅक आपल्या २०२७ मेबॅक जीएलएस ६८० या फ्लॅगशिप लक्झरी एसयूव्हीची नवीन आवृत्ती सादर केली आहे. बाह्य रचना, केबिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेकॅनिकल घटकांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करून ही कार अधिक प्रीमियम करण्यात आली आहे. अमेरिकेतील टस्कलुसा, अलाबामा येथील निर्मिती प्रकल्पातून तयार होणारी ही लक्झरी कार २०२६ च्या अखेरीस अमेरिकेतील डीलरशिप्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
बाह्य रचना आणि डिझाइनमधील बदल
नवीन मॉडेलच्या समोरील बाजूस इल्युमिनेटेड सराउंडसह मेबॅकचा खास रेडिएटर ग्रिल देण्यात आला आहे, ज्यातील ‘MAYBACH’ हे नाव प्रथमच लाईटनींग स्वरूपात दिसेल. बोनेटवर मर्सिडीजचा आयकॉनिक थ्री-पॉइंटेड स्टार आणि हेडलाइट्समध्ये रोझ गोल्ड टच दिला आहे. मागील बाजूस थ्री-डी स्टार ग्राफिक्स असलेल्या सुधारित एलईडी टेल लॅम्प्स जोडल्या आहेत. याशिवाय, ‘डार्क पेट्रोल’ आणि ‘व्हरडे सिल्व्हर’ यांसारखे नवीन रंग पर्याय, मानक २२-इंच अलॉय व्हील्स आणि २४ तास सरळ राहणारे सेंटर स्टार फिनिश असलेले पर्यायी २३-इंच फोर्ज्ड व्हील्स यात मिळतात.
पिकअप ट्रकचा बाजीगर ‘Toyota Hilux’! लाँचिंगपूर्वी समोर आली पहिली झलक, पाहा काय असेल खास
प्रीमियम केबिन आणि आरामदायी सुविधा
गाडीच्या केबिनमध्ये ‘बीच ब्राऊन/मॅचियाटो बेज’ एक्सक्लुझिव्ह नापा लेदर आणि नॅचरल ग्रेन ब्राऊन वॉलनट वूड ट्रिमचा वापर केला आहे. प्रवाशांच्या आरामासाठी पुढील सीटवर व्हायब्रेशन मसाज आणि मागील एक्झिक्युटिव्ह सीट्सवर प्रथमच ‘काफ-रेस्ट मसाज’ सुविधा देण्यात आली आहे. केबिनचे इन्सुलेशन सुधारले असून, दर ९० सेकंदांनी आतील हवा शुद्ध करणारी नवीन इलेक्ट्रिक एअर फिल्टरेशन सिस्टम आणि दोन अतिरिक्त स्पीकर्ससह ७१०-वॉटची बर्मेस्टर ३डी सराउंड साऊंड सिस्टम यात जोडली आहे.
अधिक शक्तिशाली V8 इंजिन आणि परफॉर्मन्स
या लक्झरी एसयूव्हीमध्ये ४.०-लीटर ट्विन-टर्बोचार्स्ड व्ही८ इंजिन आणि ४८-व्होल्ट माईल्ड-हायब्रिड सिस्टम दिली आहे. हे इंजिन ६०३ एचपी ताकद आणि ८५० एनएम टॉर्क जनरेट करते, जे जुन्या मॉडेलपेक्षा ५३ एचपी अधिक आहे. जलद प्रतिसादासाठी स्टीअरिंग सिस्टीम आणि हवेचे सस्पेंशन देखील अद्ययावत केले आहे.
विजेसारखा स्पीड अन् लूक एकदम कडक! Peugeot e-208 GTi येणार का भारतात? पाहा किंमत अन् भन्नाट फीचर्स!
प्रगत इन्फोटेनमेंट आणि सुरक्षितता तंत्रज्ञान
नवीन ‘मर्सिडीज-बेन्झ ऑपरेटिंग सिस्टम’वर आधारित MBUX इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये ChatGPT, मायक्रोसॉफ्ट बिंग आणि गुगल जेमिनीचा सपोर्ट देण्यात आला आहे. गाडी चालवण्याचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोपा करण्यासाठी यामध्ये १० कॅमेरे, ५ रडार सेन्सर्स, १२ अल्ट्रासॉनिक सेन्सर्स आणि नवीन सेंट्रल कॉम्प्युटिंग युनिट असलेली प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम समाविष्ट आहे.






