फोटो सौजन्य: @BestMediaInfo (X.com)
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेषतः इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरची मागणी वेगाने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची गरज आणि देखभाल खर्चात बचत यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. याशिवाय, भारत सरकारही EV विक्रीला चालना देण्यासाठी विविध अनुदान योजना, करसवलत, आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. या सर्व घटकांमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरण तयार झाले आहे. अनेक नामवंत कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत असून, भविष्यात EV सेगमेंट आणखी विस्तारण्याची शक्यता आहे. भारतीय ऑटो उद्योगासाठी ही एक मोठी संधी ठरत आहे.
एकेकाळी मार्केट गाजवणारी बाईक अनुभवतेय विक्रीत दुष्काळ ! EV मॉडेलमुळे खेळच बिघडला
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेता, अनेक कंपन्या नवनवीन EVs लाँच करत आहेत. तसेच त्यांची विक्री वाढवण्यासाठी, अनेक ऑटो कंपन्या बॉलिवूड स्टार आणि स्टार खेळाडूंना त्यांचे ब्रँड अँबेसिडर बनवतात. आता आणखी एका इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी BGauss ने एका बॉलिवूड स्टारला आपला ब्रँड अँबेसिडर बनवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बॉलिवूड स्टार अजय देवगण आता बीगॉसचा ब्रँड अँबेसिडर झाला आहे. या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर झाल्याबद्दल बॉलिवूड स्टार अजय देवगण म्हणाला की बीगॉस हा एक भारतीय ब्रँड आहे जो जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि मी या अर्थपूर्ण कारणासाठी त्यांच्याशी जोडला गेलो आहे.
Nissan Magnite CNG भारतीय बाजरात झाली लाँच, ‘एवढी’ असेल किंमत
कंपनीच्या घोषणेनंतर, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत काबरा म्हणाले, “बिगॉसमध्ये, आम्ही विशेषतः भारतीय रस्त्यांसाठी डिझाइन केलेले व्यावहारिक आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक मोबिलिटी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमची वाहने या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. अजय देवगणची लोकप्रियता आमच्या ब्रँड तत्त्वांशी पूर्णपणे जुळते आणि आम्हाला विश्वास आहे की शाश्वत शहरी गतिशीलतेला प्रोत्साहन देत असताना त्यांची पार्टनरशिप आमची पोहोच लक्षणीयरीत्या मजबूत करेल.”
कंपनी सध्या देशात दोन इलेक्ट्रिक वाहने विकते. यामध्ये BGauss RUV 350 आणि C12 यांचा समावेश आहे. कंपनीकडून दोन्ही स्कूटर 85 ते 105 किलोमीटरच्या रेंजसह उपलब्ध आहेत. त्यांची किंमत देखील 1 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम दरम्यान आहे.