फोटो सौजन्य: @BriteNissan (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार्स लाँच होत असतात. यात इलेक्ट्रिक कार्सना जबरदस्त मागणी मिळताना दिसत आहे. असे जरी असले तरी मार्केटमध्ये CNG कार्सना देखील जबरदस्त मागणी मिळताना दिसत आहे. त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्या आपल्या कार लाँच करताना त्या चे CNG व्हेरियंट सुद्धा बाजारात आणत असतात. नुकतेच Nissan ने मार्केटमध्ये आपली एक नवीन CNG कार लाँच केली आहे.
भारतीय बाजारात एंट्री लेव्हल एसयूव्ही ऑफर करणाऱ्या निसान कंपनीने Nissan Magnite CNG देखील लाँच केली आहे. ही कार कोणत्या किमतीत लाँच केली आहे? कोणत्या प्रकारच्या फीचर्ससह आणि इंजिन ऑप्शन्ससह खरेदी करता येईल? कोणत्या राज्यात ही कार प्रथम सीएनजीसह उपलब्ध करून दिले जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य
Nissan Magnite CNG ही कार त्यातील सीएनजीऐवजी रेट्रोफिटमेंटसह लाँच करण्यात आली आहे. मोटोजेनचे सीएनजी किट डीलरशिप स्तरावर बसवल्यानंतर खरेदी करता येते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मॅग्नाइट सीएनजी दोन टप्प्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही कार दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ती कार देशातील इतर राज्यांमध्येही उपलब्ध करून दिली जाईल.
कंपनी निसान मॅग्नाइट एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स ऑफर करते. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, रूफ रेल, पुश बटण स्टार्ट, ऑटो डिमिंग रियर व्ह्यू मिरर, काळा आणि ब्राउन इंटीरिअर, सॉफ्ट टच, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, फ्रंट आर्म रेस्ट, यूएसबी चार्जिंग पोर्ट असे अनेक फीचर्स आहेत.
कंपनीने या कारमध्ये त्यात एक लिटर नॅचरल एस्पिरेटेड इंजिन दिले आहे. ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह CNG देण्यात आले आहे. त्याचे नॅचरल एस्पिरेटेड इंजिन पेट्रोलमध्ये 72 पीएस पॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क देते. परंतु सीएनजीसह त्याची पॉवर थोडी कमी होईल.
करोडोंचं कार कलेक्शन असणाऱ्या Virat Kohli ची पहिली कार कोणती होती? स्वतःच केला खुलासा
भारतीय बाजारात निसान मॅग्नाइट सीएनजी 6.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येणार आहे. ही किंमत त्याच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा 75000 रुपये जास्त आहे. निसान मॅग्नाइटच्या सर्व व्हेरियंटमध्ये नॅचरली एस्पिरेटेड इंजिनसह सीएनजी देण्यात येत आहे, ज्यासाठी सीएनजीसाठी 75000 रुपये अतिरिक्त किंमत मोजावी लागेल. यासोबतच, कंपनी सीएनजी व्हेरियंटवर तीन वर्षे किंवा एक लाख किलोमीटरची वॉरंटी देखील देत आहे. यासोबतच, त्याची टेस्ट ड्राइव्ह देखील जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.