Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

ब्राह्मणी गावात एकाच रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात अचानक दहशतीचे सावट पसरले आहे. चौकाचौकात मध्यरात्री नेमके काय घडले आणि यामागे कोणाचा गूढ हात आहे, याचा शोध आता स्थानिक नागरिक आणि प्रशासन घेत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 20, 2026 | 07:54 PM
Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
Follow Us
Follow Us:
  • ब्राह्मणी गावातील अनेक प्रमुख चौकांमध्ये मध्यरात्री लिंबू आणि रंगोळी घालून विचित्र विधी केल्याचे उघडकीस आले.
  • या संशयास्पद प्रकारामुळे गावात अघोरी कृत्य आणि अंधश्रद्धेची प्रचंड दहशत पसरून अफवांचे पीक आले आहे.
  • भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील ब्राह्मणी गावात मंगळवारी, रात्री घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील अनेक प्रमुख चौक आणि रस्त्यांवर अचानक रंगोळी काढून त्यावर लिंबू ठेवून पूजा-अर्चना केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांचे लक्ष या प्रकाराकडे जाताच गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. गावातील केवळ एकाच ठिकाणी नव्हे, तर अनेक वेगवेगळ्या चौकांमध्ये अशा प्रकारे एकसारख्या हालचाली दिसून आल्याने ग्रामस्थांच्या शंकेत आणखी भर पडली. रात्रीच्या वेळी अचानक विविध ठिकाणी रंगोळी आणि त्यावर लिंबू ठेवल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी घराबाहेर पडून परिस्थितीची पाहणी केली.

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

ग्रामस्थांची प्रशासनाकडे चौकशीची मागणी

या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. काहींनी सुरक्षेचा उपाय म्हणून महिला व लहान मुलांना रात्री घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. या प्रकारामुळे गावात अनावश्यक गैरसमज आणि अफवांचा बाजार गरम झाला असून, या घटनेमागील सत्यता समोर येणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे गावात भीतीचे व अफवांचे वातावरण तयार होत असल्याने ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तपास करावा, अशी मागणी केली आहे

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर

काही ग्रामस्थांनी हा प्रकार अंधश्रद्धेशी व अघोरी प्रथेसी जोडला, तर काहींनी हा गुप्त पूजा-अर्चना किंवा विधीचा भाग असल्याचा अंदाज वर्तविला. मात्र, हे कृत्य नेमके कोणी केले आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

Web Title: Brahmani village fear after mysterious overnight superstitious incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra
  • News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.