फोटो सौजन्य: Pinterest
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कोडाकडून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील काइलॅकला अपडेट करण्याची तयारी सुरू आहे. या अपडेटनंतर ही एसयूव्ही नव्या तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकते.
अहवालांनुसार, Skoda Kylaq ला CNG पर्यायासह लाँच करण्याची तयारी कंपनी करत आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही डीलरशिप स्तरावर CNG किटसह ऑफर केली जाऊ शकते. यापूर्वीही अनेक वाहन उत्पादक आपली वाहने अशाच प्रकारे CNG पर्यायासह उपलब्ध करून देतात.
Skoda Kylaq मध्ये 1.0 लिटर क्षमतेचे TSI पेट्रोल इंजिन दिले जाते. हे इंजिन 85 किलोवॅटची पॉवर आणि 178 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि DCT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.
‘हा’ हिशोब लक्षात ठेवा! थेट दारात उभी राहील Toyota Hyryder CNG, फक्त ‘इतकाच’ असेल EMI
स्कोडाकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. मात्र, अंदाजानुसार ही एसयूव्ही पुढील काही महिन्यांत बाजारात दाखल होऊ शकते.
जर Skoda Kylaq CNG पर्यायासह सादर केली गेली, तर तिची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सामान्य वेरिएंटच्या तुलनेत सुमारे 70 ते 90 हजार रुपयांनी अधिक असू शकते.






