Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या गाडीतील ‘डॅश कॅम’ अपघात आणि कायदेशीर वादात कसा ठरू शकतो गेम चेंजर? जाणून घ्या

गाडीतील डॅश कॅम अपघाताच्या वेळी तुमची चूक नसताना कायदेशीर आणि विम्याच्या कामात ठोस पुरावा म्हणून उपयोगी पडतो. यामुळे चुकीचे आरोप, रस्त्यावरील वाद आणि होणारे मोठे आर्थिक नुकसान यांपासून तुमचे उत्तम संरक्षण होते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 03:09 PM
तुमच्या गाडीतील ‘डॅश कॅम’ अपघात आणि कायदेशीर वादात कसा ठरू शकतो गेम चेंजर? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

आजकाल रस्त्यावरील वाहनांची संख्या आणि अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा वेळी रस्त्यावर कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अपघात झाल्यास चूक कोणाची, यावरून होणारे वाद आणि पोलिसांच्या कचाट्यातून सुटणे खूप कठीण होऊन बसते. या सर्व त्रासातून वाचण्यासाठी आजच्या काळात गाड्यांमध्ये ‘डॅश कॅम’ (Dashboard Camera) बसवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

हा एक छोटासा कॅमेरा केवळ प्रवास रेकॉर्ड करत नाही, तर कठीण प्रसंगात तुमचा जीव, पैसा आणि सन्मान कसा वाचवू शकतो, हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया,

१. अपघाताच्या वेळी निर्दोषत्वाचा ठोस पुरावा

रस्त्यावर अनेकदा मोठ्या गाडीची चूक नसतानाही, ‘मोठी गाडी म्हणजेच तिचीच चूक असणार’ असा लोकांचा गैरसमज असतो. जर एखादी पादचारी व्यक्ती किंवा दुचाकीस्वार तुमच्या गाडीसमोर अचानक आला आणि अपघात झाला, तर डॅश कॅमचे रेकॉर्डिंग हा तुमचा सर्वात मोठा पुरावा ठरतो. हे फुटेज पोलिसांना दाखवून तुम्ही कायदेशीर कारवाई आणि खोट्या आरोपांपासून स्वतःला वाचवू शकता.

भारतातील कार इन्शुरन्सचे हे महत्त्वाचे नियम तुम्हाला माहित आहेत का? नसतील तर आत्ताच माहिती करून घ्या

२. इन्शुरन्स क्लेम (विमा मिळवणे) होतो सोपा आणि जलद

अपघातानंतर विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कंपन्या अनेक कागदपत्रांची आणि पुराव्यांची मागणी करतात. कधीकधी तपास प्रक्रियेत महिने निघून जातात. अशा वेळी डॅश कॅमचे व्हिडिओ फुटेज विमा कंपनीला दिल्यास, अपघाताची सत्यता लगेच पटते. यामुळे तुमचा क्लेम कोणत्याही त्रासाशिवाय आणि वेळेत मंजूर होतो, ज्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचतात.

३. ‘रोड रेज‘ आणि भ्रष्टाचारापासून संरक्षण

रस्त्यावर विनाकारण वाद घालणारे किंवा मुद्दाम गाडीला धडक देऊन पैसे उकळणारे ब्लॅकमेलर्स आजकाल खूप वाढले आहेत. तसेच, कधीकधी काही भ्रष्ट अधिकारीही चुकीच्या पद्धतीने दंडाची भीती दाखवतात. जेव्हा समोरच्या व्यक्तीला समजते की तुमच्या गाडीत डॅश कॅम लावलेला आहे आणि त्याचे कृत्य रेकॉर्ड होत आहे, तेव्हा समोरचा वाद घालण्याचे धाडस करत नाही.

विमा कंपनीने तुमचा क्लेम केलाय रिजेक्ट? IRDAI चा नवा नियम करेल तुमची मदत, कशी ते जाणून घ्या…

४. पार्किंगमधील चोऱ्या आणि तोडफोडीवर नजर

अनेक डॅश कॅममध्ये ‘पार्किंग मोड’ नावाचे वैशिष्ट्य असते. म्हणजेच, तुम्ही गाडी पार्क करून कुठे लांब गेलात आणि गाडी बंद असेल, तरीही गाडीला कोणी धक्का लावल्यास किंवा तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यास कॅमेरा आपोआप चालू होतो आणि रेकॉर्डिंग सुरू करतो. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा अनोळखी ठिकाणी तुमची गाडी सुरक्षित राहते.

५. चालकावर नियंत्रण

जर तुम्ही तुमची गाडी चालक, नातेवाईक किंवा मित्राला दिली असेल, तर ते गाडी कशी चालवत आहेत, यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. काही प्रगत डॅश कॅम थेट मोबाईल ॲपशी जोडलेले असतात, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या गाडीच्या आतील आणि बाहेरील हालचाली थेट पाहू शकता. यामुळे गाडीचा गैरवापर टळतो.

थोडक्यात सांगायचे तर– डॅश कॅमवर आज केलेला छोटासा खर्च भविष्यातील मोठ्या आर्थिक नुकसानीपासून आणि कायदेशीर मानसिक त्रासापासून तुमचे संरक्षण करतो. गाडीच्या सुरक्षेसाठी आणि स्वतःच्या मानसिक शांततेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक पर्याय आहे.

Web Title: Car dash cam benifits auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

Honda CB1000 Hornet SP: फायरब्लेडचे इंजिन आणि सुपरबाइकचे फीचर्स! जाणून घ्या होंडा CB1000 Hornet SP मधील खास गोष्टी!
1

Honda CB1000 Hornet SP: फायरब्लेडचे इंजिन आणि सुपरबाइकचे फीचर्स! जाणून घ्या होंडा CB1000 Hornet SP मधील खास गोष्टी!

मेट्रोतून उतरा आणि लगेच इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने घ्या! दिल्लीत मेट्रो प्रवाशांसाठी भागो मोबिलिटी आणि होंडाची नवी भेट
2

मेट्रोतून उतरा आणि लगेच इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने घ्या! दिल्लीत मेट्रो प्रवाशांसाठी भागो मोबिलिटी आणि होंडाची नवी भेट

Bajaj Auto: बजाज ऑटोची सणासुदीची मोठी तयारी! ३ नवी प्रोडक्ट्स आणि २ नवीन ब्रँड्स होणार लाँच!
3

Bajaj Auto: बजाज ऑटोची सणासुदीची मोठी तयारी! ३ नवी प्रोडक्ट्स आणि २ नवीन ब्रँड्स होणार लाँच!

70,000 रुपयांच्या आत ‘या’ आहेत सर्वात बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स! ते ही प्रीमियम फीचर्स आणि चांगल्या बॅटरी सहित!
4

70,000 रुपयांच्या आत ‘या’ आहेत सर्वात बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स! ते ही प्रीमियम फीचर्स आणि चांगल्या बॅटरी सहित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.