
कार बाहेरून कितीही चकाचक असली, तरी आपण आपला जास्तीत जास्त वेळ कारच्या आत घालवतो. त्यामुळे कारचे इंटेरियर स्वच्छ आणि ताजेतवाने असणे अत्यंत गरजेचे आहे. दरवेळी महागड्या वॉशिंग सेंटरमध्ये जाण्याऐवजी, तुम्ही घरच्या घरी अवघ्या ५ सोप्या स्टेप्समध्ये कारचे केबिन नव्यासारखे चमकवू शकता.
स्टेप १: कचरा काढणे आणि व्हॅक्यूम क्लीनिंग
सगळ्यात आधी कारमधील मॅट्स बाहेर काढा. सीटखालील, कप होल्डरमधील आणि दरवाजांच्या कप्प्यांमधील नको असलेला कचरा किंवा कागद फेकून द्या. त्यानंतर व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने सीट, फ्लोअर आणि कोनाकोपऱ्यातील बारीक धूळ पूर्णपणे ओढून घ्या.
स्टेप २: कार मॅट्सची स्वच्छता
बाहेर काढलेल्या मॅट्स जर रबर किंवा प्लास्टिकच्या असतील, तर त्या पाण्याने आणि शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या. जर त्या फॅब्रिक प्रकारच्या असतील, तर ब्रशने झाडून व्हॅक्यूम करून घ्या. मॅट्स पूर्ण सुकल्यानंतरच कारमध्ये परत टाकाव्यात.
ड्रायव्हिंग करताना पाठ आणि मान दुखतेय? ‘या’ ५ कार सीट अॅक्सेसरीज तुम्हाला देतील झटपट आराम!
स्टेप ३: डॅशबोर्ड आणि कन्सोल साफ करणे
डॅशबोर्ड, स्टीअरिंग व्हील आणि गिअर बॉक्सवर सर्वाधिक धूळ आणि हाताचे डाग असतात. हे स्वच्छ करण्यासाठी एका मायक्रोफायबर कपड्यावर थोडे ‘इंटेरियर क्लिनर’ किंवा पाण्याचे काही थेंब टाकून डॅशबोर्ड हलक्या हाताने पुसून घ्या. बटणे आणि एसी व्हेंट्समधील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना टूथब्रश किंवा पेंट ब्रश वापरू शकता.
स्टेप ४: सीट आणि डोअर पॅनेल्स क्लीनिंग
तुमच्या कारच्या सीट्स लेदरच्या असतील, तर लेदर क्लिनर आणि मऊ कपड्याचा वापर करा. फॅब्रिक सीट्ससाठी कोमट पाण्यात थोडे लिक्विड डिटर्जंट मिसळून कापडाने डाग स्वच्छ करा. कारच्या दरवाजांचे आतील भाग देखील याच पद्धतीने पुसून घ्या.
स्टेप ५: काचा साफ करणे आणि एअर फ्रेशनर
शेवटच्या स्टेपमध्ये कारच्या सर्व काचा आणि विंडशील्ड आतल्या बाजूने ग्लास क्लिनरने साफ करा, जेणेकरून ड्रायव्हिंग करताना समोरचे स्पष्ट दिसेल. शेवटी कारमध्ये एक चांगला एअर फ्रेशनर स्प्रे करा किंवा कार परफ्युम ठेवा.
महत्त्वाची टीप- कार साफ करताना नेहमी मायक्रोफायबर कपड्याचाच वापर करा, यामुळे स्क्रॅच पडत नाहीत.
या ५ सोप्या स्टेप्स महिन्यातून दोनदा फॉलो केल्यास तुमची कार आतून नेहमीच फ्रेश, सुगंधी आणि अगदी शोरूममधून आणल्यासारखी नवीन दिसेल.