Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाचा मोठा पुढाकार; ग्राहकांसाठी ‘ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६’चे आयोजन

किया इंडियाने ग्राहकांसाठी ३ ते १२ जुलै २०२६ दरम्यान ३६५ शहरांमधील ५२१ वर्कशॉप्समध्ये 'ओनरशिप सर्व्हिस कॅम्प' आयोजित केला असून, यात कार मेंटेनन्सवर व स्पेअर पार्टसवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 05, 2026 | 05:30 PM
किया इंडियाचा मोठा पुढाकार; ग्राहकांसाठी ‘ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६’चे आयोजन
Follow Us
Follow Us:

ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण आणि फायदेशीर मालकीहक्क अनुभव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ कर किया इंडियाने आज किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ ची घोषणा केली आहे. हा कॅम्प ३ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची विक्रीपश्चात सेवा, वेईकलची सर्वसमावेशक केअर आणि विशेष फायदे सहज उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा असलेला भर लक्षात घेऊन हा उपक्रम ३६५ शहरांमधील कियाच्या ५२१ अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल.

या सर्व्हिस कॅम्पदरम्यान किया इंडिया ग्राहकांसाठी अनेक विशेष फायदे देत आहे. यामध्ये कार केअर सर्व्हिसेसवर २० टक्‍के सूट, एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सूट, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) प्लॅन्सवर १० टक्‍के सूट, पार्ट्स व लेबर चार्जवर (मजुरी) १० टक्‍के सूट आणि किया जेन्युइन अॅक्सेसरीजवर १० टक्‍के सूट समाविष्ट आहे. कियाच्या अधिकृत सर्व्हिस नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सोयीस्कर, उत्तम सुरक्षा आणि किफायतशीर दरात वेईकलची देखभाल करता यावी, यासाठी या मूल्यवर्धित सेवा डिझाइन केल्या आहेत.

जेव्हा ‘हार्ले-डेव्हिडसनने’ बाईकच्या आवाजाचेच पेटंट मागितले! ६ वर्षांचा कोर्ट ड्रामा आणि इंजिनचा ‘तो’ लेजंडरी आवाज!

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे कस्टमर एक्सपिरियन्सचे व्हाईस प्रेसिडेंट भीमसेन गुलाबानी म्हणाले “किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ मधून ग्राहकांना विनासायास व वैविध्‍यपूर्ण मालकीहक्क अनुभव देण्याप्रती आमची दृढ कटिबद्धता दिसून येते. या देशव्यापी उपक्रमाद्वारे आमचा ग्राहकांना त्यांचे वेईकल्‍स उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यास मदत करण्‍याोबत पारदर्शक, सुलभ आणि फायदेशीर विक्रीपश्चात सेवा देऊन त्यांच्याशी दीर्घकालीन संबंध दृढ करणे हा उद्देश आहे. आम्ही आमच्या सर्व्हिसचे दर्जेदार मानक सुधारत असताना ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या आणि भारतातील अत्यंत विश्वासार्ह मोबिलिटी ब्रँड म्हणून कियाचे स्थान प्रबळ करणाऱ्या अनुभवांची निर्मिती करण्यावर आमचा भर कायम आहे.”

या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून ग्राहकांना वेईकल्‍सची मोफत ३६-पॉइंट हेल्थ चेक-अप सुविधा देखील मिळेल. यामध्ये वेईकलचा बाह्य भाग (एक्‍स्‍टीरिअर), अंतर्गत भाग (इंटीरिअर), इंजिन कंपार्टमेंट आणि अंडरबॉडी यांसारख्या महत्त्वपूर्ण भागांची तपासणी केली जाईल. संभाव्य समस्या वेळीच ओळखून वेईकलचे आयुष्य वाढवणे, तसेच सुरक्षितता, उत्तम कामगिरी आणि ड्रायव्हिंगचा आत्मविश्वास सुनिश्चित करणे हा या सर्वसमावेशक तपासणीचा उद्देश आहे. हा उपक्रम वेईकलच्‍या प्रतिबंधात्मक देखभालीला प्रोत्साहन देण्यासाठी, अधिकृत सर्व्हिस नेटवर्कसोबत ग्राहकांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे सर्व्हिस मानक प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

याव्यतिरिक्त, ग्राहक आकर्षक एक्सचेंज ऑफर्ससोबत मोफत युज्‍ड-कारच्या मूल्यमापन सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना कियाच्या पोर्टफोलिओमधील भविष्यातील गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचे पर्याय पडताळून पाहता येतील. ग्राहकांच्या अपेक्षा बदलत आहेत, तसे किया इंडिया सर्व्हिसमधील उत्कृष्टता, सुलभता आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून आपली विक्रीपश्चात परिसंस्‍था अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ उपक्रम ग्राहकांचा कार मालकीचा अनुभव अधिक उंचावून आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह आफ्टरसेल्स सर्व्हिस ब्रँड बनण्याच्या कियाच्या उद्दिष्टाला पाठबळ देऊन हीच कटिबद्धता अधोरेखित करतो.

आपले सर्व्हिस नेटवर्क, डिजिटल क्षमता आणि ग्राहक सहभाग उपक्रमांमध्ये सातत्याने गुंतवणूक करून किया इंडिया ग्राहकांना ड्रायव्हिंगइतकाच कार बाळगण्याचा अनुभव आनंददायी आणि फायदेशीर करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच आफ्टरसेल्स क्षेत्रात उत्कृष्टतेचे नवीन मापदंड स्थापित करत आहे.

Web Title: Kia india ownership service camp 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • automobile
  • kia

संबंधित बातम्या

गाड्यांच्या ‘इंडीकेटर’चा शोध लावला होता या ‘हॉलीवूड अभिनेत्रीने’! जाणून घ्या इंडीकेटरच्या इतिहासाची ही रंजक गोष्ट
1

गाड्यांच्या ‘इंडीकेटर’चा शोध लावला होता या ‘हॉलीवूड अभिनेत्रीने’! जाणून घ्या इंडीकेटरच्या इतिहासाची ही रंजक गोष्ट

जेव्हा ‘हार्ले-डेव्हिडसनने’ बाईकच्या आवाजाचेच पेटंट मागितले! ६ वर्षांचा कोर्ट ड्रामा आणि इंजिनचा ‘तो’ लेजंडरी आवाज!
2

जेव्हा ‘हार्ले-डेव्हिडसनने’ बाईकच्या आवाजाचेच पेटंट मागितले! ६ वर्षांचा कोर्ट ड्रामा आणि इंजिनचा ‘तो’ लेजंडरी आवाज!

‘धूम मचाले’! ट्रक्सचे असे ‘म्युझिकल हॉर्न’ ऐकलेत का? जाणून घ्या ड्रायव्हर्स हे हॉर्न का लावतात आणि RTO चा बंदीचा कायदा काय सांगतो?
3

‘धूम मचाले’! ट्रक्सचे असे ‘म्युझिकल हॉर्न’ ऐकलेत का? जाणून घ्या ड्रायव्हर्स हे हॉर्न का लावतात आणि RTO चा बंदीचा कायदा काय सांगतो?

गाड्यांमध्ये येतोय ‘सायलेंट हॉर्न’! फक्त गाडी समोरच्या पादचाऱ्याला जाणार आवाज ऐकू!
4

गाड्यांमध्ये येतोय ‘सायलेंट हॉर्न’! फक्त गाडी समोरच्या पादचाऱ्याला जाणार आवाज ऐकू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.