फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो कंपन्या नेहमीच बेस्ट फीचर्स असणाऱ्या कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. भारतात स्वदेशी सोबतच विदेशी ऑटो कंपन्या सुद्धा कार्यरत आहे. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे Citroen.
फ्रेंच कार उत्पादक कंपनी सिट्रोएन लवकरच भारतात त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक C3 चे डार्क एडिशन व्हर्जन लाँच करणार आहे. या स्पेशल व्हर्जनची माहिती गेल्या आठवड्यात एका टीझरद्वारे उघड करण्यात आली होती. आता या कार संबंधित काही नवीन डिटेल्स मिळाले आहेत, जे कार प्रेमींसाठी महत्वाचे ठरणार आहेत. खास गोष्ट म्हणजे ही डार्क एडिशन फक्त C3 पुरती मर्यादित राहणार नसून ती Basalt आणि Aircross मॉडेल्समध्ये देखील दिसेल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अरे बापरे ! Kia ला समजण्याच्या आतच ‘या’ प्लांटमधून 900 इंजिनची चोरी, आता पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
नवीन Citroen C3 Dark Edition मध्ये, ग्राहकांना ऑल ब्लॅक एक्सटिरिअर लूक मिळेल, ज्यामध्ये अनेक एलिमेंट्स ब्लॅक-आउट केले जातील. फ्रंट आणि रिअर फॉक्स स्किड प्लेट्सना सिल्व्हर फिनिश मिळेल, तर अलॉय व्हील्समध्ये ड्युअल-टोन डिझाइन असेल, जे त्याचे स्पोर्टी लूक आणखी वाढवेल.
इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, कारमध्ये ऑल ब्लॅक केबिन थीम असेल, ज्यामध्ये लाल रंगाच्या शिलाईसह डॅशबोर्ड, सीट्स आणि आर्मरेस्टला सजवले. याशिवाय, सीट बेल्ट कुशन, नेक पिलो इत्यादी काही अॅक्सेसरीज देखील यामध्ये उपलब्ध असतील, ज्यामुळे हे या कारचे डार्क एडिशन व्हर्जन अधिक खास होईल.
फक्त 11 हजारांचे डाउन पेमेंट आणि Royal Enfield Classic 350 होईल तुमची, दरमहा द्यावा लागेल इतकाच EMI?
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, डार्क एडिशनमध्ये कोणतेही मेकॅनिकल बदल केलेले नाहीत. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज्ड दोन्ही व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल. तसेच, ग्राहकांची इच्छा असल्यास, ते मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील निवडू शकतात.
या विशेष व्हर्जनचे उद्दिष्ट सिट्रोएनच्या प्रॉडक्ट लाइनअपमध्ये एक प्रीमियम आणि स्टायलिश टच जोडणे आहे, विशेषतः तरुणांना लक्षात घेऊन ही कार डिझाइन केलेली आहे, ज्यांना काहीतरी वेगळे आणि धाडसी आवडते.
सिट्रोएन C3 डार्क एडिशन लवकरच लाँच केले जाणार आहे. याची किंमत स्टॅंडर्ड व्हर्जनपेक्षा थोडी जास्त असण्याची अपेक्षा आहे. परंतु या व्हर्जनमध्ये प्रीमियम टच देण्यात आला आहे. हे निश्चितच त्याच्या किमतीला न्याय देते, म्हणून जर तुम्ही वेगळ्या आणि ट्रेंडी हॅचबॅकच्या शोधात असाल, तर C3 डार्क एडिशन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.