फोटो सौजन्य: Pinterest
भारतात या ब्रँडचे एन्ट्री-लेव्हल वाहन म्हणून ओळखली जाणारी C3, परवडणारी आणि शहरात वापरण्यास अत्यंत सोयीस्कर अशी कार शोधणाऱ्या ग्राहकांना आजही मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे, C3 ची सुरुवातीची ‘एक्स-शोरूम’ किंमत 4.99 लाख रुपये इतकी आहे.
शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…
Citroen C3X मध्ये स्टँडर्ड C3 च्या तुलनेत 15 नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यात प्रॉक्सिमिटी-सेंस पॅसिव एंट्री आणि पुश स्टार्ट, की-लेस एंट्री/स्टार्ट, क्रूज कंट्रोल आणि स्पीड लिमिटर, 6 एअरबॅग्स, HALO 360 डिग्री कॅमेरा सिस्टम, LED व्हिजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED DRLs आणि LED फॉग लॅम्प्स यांचा समावेश आहे.
याशिवाय 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, तसेच ट्रॉपिकलाइज्ड ऑटोमॅटिक AC हे फीचर्स मिळतात. 315 लिटर बूट स्पेस आणि रिअर USB टाइप-C चार्जिंग सिस्टमही देण्यात आली आहे. भारतात या SUV ची स्पर्धा Nissan Magnite, Tata Punch, Hyundai Exter तसेच Maruti WagonR आणि Maruti Swift यांच्याशी होते.
C3X SUV दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. पहिला 1.2 लिटर नॅचरल्ली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 82hp पॉवर देते आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येते. दुसरा 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून ते 110hp पॉवर देते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत उपलब्ध आहे.
कंपनीनुसार या कारचे ARAI मायलेज 18.30 kmpl आहे. मात्र रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये टर्बो ऑटोमॅटिक व्हेरिएंटने शहरात 8.46 kmpl आणि हायवेवर 13.38 kmpl मायलेज दिले, तर सरासरी मायलेज 10.92 kmpl राहिले.
या 1.2 लिटर टर्बो इंजिनमधून 110hp पॉवर आणि 205Nm टॉर्क मिळतो. याचे थ्रॉटल कॅलिब्रेशन आक्रमक असल्यामुळे कार जलद आणि रिस्पॉन्सिव वाटते. त्यामुळे वेगात ड्रायव्हिंग आणि ओव्हरटेकिंग आवडणाऱ्यांसाठी ही कार योग्य ठरते. मात्र, याच कारणामुळे प्रत्यक्ष वापरात मायलेज थोडे कमी मिळते.






