
फोटो सौजन्य: @DucatiMotor/ X.com
डुकाटीने भारतात Panigale V4 Tricolore ही सुपरबाइक अधिकृतरित्या लाँच झाली आहे. ही बाईक मर्यादित संख्येतच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून, त्यामुळे ती अत्यंत खास मानली जात आहे. ही बाईक Panigale V4 या मॉडेलवर आधारित आहे.
‘या’ ऑटो कंपनीमुळे गुजरातची लॉटरी निघाली! 35 हजार कोटींची गुंतवणूक अन् 12000 नोकऱ्या..
ही बाईक केवळ 1000 युनिट्सपुरतीच तयार करण्यात आली आहे. प्रत्येक युनिटला स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून, त्यामुळे ही लिमिटेड एडिशन बाईक कलेक्टर्ससाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
Ducati Panigale V4 Tricolore मध्ये 1103 सीसी क्षमतेचे लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन तब्बल 216 हॉर्सपावर आणि 120 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यामध्ये पाच-स्पोक कार्बन फायबर रिम्स देण्यात आले असून, त्यामुळे सामान्य Panigale V4 च्या तुलनेत बाईकचे वजन कमी झाले आहे.
या सुपरबाईकमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात फ्रंट प्रो ब्रेकिंग सिस्टम, डबल डिस्क ब्रेक, विविध राइडिंग आणि पॉवर मोड्स, रेस eCBS, Ducati ट्रॅक्शन कंट्रोल, व्हिली कंट्रोल, स्लाइड कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल, ब्रेक लाइट, Ducati पॉवर लाँच, क्विक शिफ्टर, एलईडी हेडलाइट्स व डीआरएल, स्टीयरिंग डॅम्पर, ऑटो ऑफ इंडिकेटर, अँटी-थेफ्ट सिस्टीम, TPMS व टेंपरेचर सेन्सर, यूएसबी पोर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शन, 6.9 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तसेच रोड आणि ट्रॅक इन्फॉर्मेशन मोड्सचा समावेश आहे.
1 लाख रुपयांच्या आत बाईक शोधताय? ‘या’ पर्यायांवर एकदा नजर फिरवाच
याशिवाय, वजन कमी करण्यासाठी कार्बन फायबरचे फ्रंट व रियर मडगार्ड, चेन गार्ड, हील गार्ड, स्विंगआर्म कव्हर, एग्झॉस्ट गार्ड, अल्टरनेटर कव्हर आणि रिम्स देण्यात आले आहेत.
डुकाटीने Ducati Panigale V4 Tricolore ची एक्स-शोरूम किंमत तब्बल 77 लाख रुपये निश्चित केली आहे. तसेच, या सुपरबाईकसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.