फोटो सौजन्य: iStock
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड गुजरातमधील खोर्जा येथे नवीन प्लांट बांधण्यासाठी 35000 कोटींची गुंतवणूक करत आहे. कंपनीची या प्लांटमध्ये दरवर्षी एकूण 10 लाख कारचे उत्पादन करण्याची योजना आहे. शिवाय, नवीन ऑटो प्लांटमुळे अंदाजे 12000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.
500+ किमी रेंज, 8 वर्षाची वॉरंटी अन् बरंच काही! भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर
मारुती सुझुकीचा गुजरातमधील प्लांट गुजरात औद्योगिक विकास महामंडळ (GIDC) द्वारे प्रदान केलेल्या 1750 एकर जमिनीवर बांधला जाईल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिताची ताकेची यांनी गांधीनगर येथे राज्य सरकार आणि ऑटोमेकर यांच्यात झालेल्या समारंभात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना गुंतवणूक पत्र सादर केले. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि मारुती सुझुकीचे पूर्णवेळ संचालक आणि कार्यकारी समिती सदस्य सुनील कक्कर हे देखील उपस्थित होते.
ऑटोमोबाईल क्षेत्रात गुजरात आणखी वेगाने प्रगती करणार असल्याचे चित्र आहे. याबाबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी लिहिले की, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडकडून खोरज येथे 35000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मेगा कार उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी गुजरात सरकारकडे इन्व्हेस्टमेंट लेटर सुपूर्द करण्यात आले, याचा आनंद आहे.
Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले की, या प्रकल्पामुळे सहाय्यक उद्योग आणि MSME क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, तसेच राज्यात एक मजबूत ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तयार होईल.
भारत–जपान भागीदारीचे कौतुक करताना मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, मारुती सुझुकीची गुजरातमधील उपस्थिती ही धोरणाधारित प्रशासन, जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधांचे जाळे आणि उद्योगपूरक वातावरण यावर असलेल्या जागतिक विश्वासाचे प्रतीक आहे. गुजरात हे भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल हबपैकी एक म्हणून तसेच जागतिक गुंतवणूकदारांची पसंतीची ठिकाणे म्हणून भक्कमपणे पुढे येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.






