EKA Mobility चा मुंबईत विस्तार, नवीन डिलरशिपच्या उद्घाटनाची केली घोषणा
आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन व तंत्रज्ञान कंपनी ईका मोबिलिटीने मुंबईत, राजस राइड सोबतच्या सहयोगातून आपली नवीन डिलरशिप सुरू केली असल्याची घोषणा केली आहे. ही डिलरशिप राष्ट्रीय महामार्ग 48, वसई (पूर्व), पालघर जिल्हा, महाराष्ट्र – 401208 येथील परमार इंडस्ट्रियल इस्टेटजवळ स्थित आहे. ऑल-रेंज डिलरशिप म्हणून ओळखली जाणारी ही जागा इलेक्ट्रिक प्रवासी तसेच व्यावसायिक वाहनांचा संपूर्ण पोर्टफोलिओ उपलब्ध करून देते. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये धोरणात्मक दृष्ट्या योग्य ठिकाणी असलेली ही डिलरशिप सुरत, अहमदाबाद आणि इतर प्रमुख औद्योगिक केंद्रांपासून जवळ असल्यामुळे ग्राहक आणि व्यवसायिकांसाठी उपयुक्त ठरते.
ही डिलरशिप सर्वसमावेशक 3S सुविधा (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स) प्रदान करते. येथे ग्राहक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ईका मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव घेऊ शकतात, खरेदी करू शकतात आणि त्याचबरोबर उत्तम सर्व्हिस तसेच जेन्युइन स्पेअर पार्ट्स सपोर्ट मिळवू शकतात.
6000 चौरस फूट जागेत पसरलेल्या या डिलरशिपमध्ये भारतातील इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांची सर्वात मोठी श्रेणी पाहायला मिळते. यात इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स तसेच लहान व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. विशेषतः, ईका 7टी आणि 55टी इलेक्ट्रिक ट्रक्स, ईका 7एम, 9एम आणि 12एम इलेक्ट्रिक बसेस, लो-फ्लोअर बस आणि कोच, तीनचाकी इलेक्ट्रिक कार्गो, दैनंदिन प्रवासासाठी ईका ३एस तीन-आसनी पॅसेंजर वाहन, तसेच ईका ६एस या भारतातील स्टिअरिंग व्हील असलेली पहिली इलेक्ट्रिक तीन-चाकी पॅसेंजर वाहन यांचा समावेश आहे.
या लाँचबाबत ईका मोबिलिटीचे व्यवसाय प्रमुख आणि चीफ ग्रोथ ऑफिसर रोहित श्रीवास्तव यांनी सांगितले, “मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून येथे परिवहन व्यवसाय व दैनंदिन जीवनाला चालना मिळते. राजस मोटर्ससोबतच्या पार्टनरशिपमधून आम्ही या महत्त्वपूर्ण परिसंस्थेला शुद्ध, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सुसज्ज गतीशीलतेमध्ये रूपांतरित करत आहोत. ईका मोबिलिटीमध्ये आमचा विश्वास शाश्वतता व लाभक्षमता एकत्र आणण्यावर आधारित आहे आणि आमच्या ईव्हींमधून सिद्ध होते की हे वाहन व्यवसायिक खर्च कमी करून हरित भविष्यासाठी योगदान देतात.”
त्याचबरोबर राजस राइड एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जोशी यांनी म्हटले, “या नवीन सहयोगासह मुंबईत डिलरशिप सुरू होत असून गतीशीलतेच्या भविष्यासाठी गेटवे तयार होत आहे. ईका मोबिलिटीसोबत आमची पार्टनरशिप व्यवसाय व समुदायांना शाश्वत, विश्वसनीय व लाभदायी परिवहन सोल्यूशन्ससह सक्षम करेल, तसेच शुद्ध गतीशीलता हे भविष्यातील स्मार्ट निवड असल्याचे सिद्ध करेल.”
मुंबईव्यतिरिक्त कंपनीने विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे देखील नवीन डिलरशिप सुरू करून देशभरातील उपस्थिती अधिक दृढ केली आहे.