लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास(फोटो सौजन्य: aniruddhacharyajimaharaj/ instagram)
अनिरुद्धाचार्य महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच त्याचे काही अजब सल्ले देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, याव्यतिरिक्त अनिरुद्धाचार्य महाराजांना आलिशान कारची सुद्धा आवड आहे. ते नेहमीच त्यांच्या आलिशान कारने फिरत असतात. असाच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात आध्यात्मिक गुरू अनिरुद्धाचार्य लंडनच्या रस्त्यांवरून ब्ल्यू रेंज रोव्हर स्पोर्टमधून प्रवास करताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, जशी कार कॅमेऱ्याजवळ येते, अनिरुद्धाचार्य महाराज हात जोडून म्हणतात “चला, आता परत जाऊ या भारतात, वृंदावन श्रीकृष्णाच्या जवळ. लंडनची कथा संपली आहे.” त्यांच्या या अंदाजाने त्यांनी भक्तांचे मन जिंकले.
‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स
अनिरुद्धाचार्य याच्या पोस्टवर श्रद्धाळू नेहमीच आपली भावना व्यक्त करताना दिसत असतात. त्याच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी “राधे राधे” आणि “जय श्रीकृष्ण” असे लिहिले आहे. तर काहीजण आश्चर्यचकित झाले की एक आध्यात्मिक गुरु इतक्या लक्झरी कारमध्ये प्रवास करतात. एका युजरने लिहिले, “Range Rover चे पैसे कुठून येतात?” दुसऱ्याने कमेंट केले “गुरुजी, आपण तर प्रायव्हेट जेटसाठीही योग्य आहात.”
अनिरुद्धाचार्य यांचा हा व्हिडिओ त्यांच्या अनुयायांना भावनिक करत असतानाच, लोकांमध्ये लक्झरी जीवनशैली आणि अध्यात्माच्या संयोजनाबद्दल वादविवाद देखील सुरू करत आहे. तथापि, त्यांचे भक्त मानतात की हे फक्त साधन आहे आणि खरे महत्त्व त्यांच्या प्रवचनांमध्ये आणि भक्तीत आहे.
बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी
अनिरुद्धाचार्य यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान कारचा समावेश आहे. त्यांच्याकडे Kia Carnival, Mercedes GLA, Volvo XC40, Volvo XC90, आणि Land Rover Defender सारख्या कार आहेत.