उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो- यट्यूब)
Dasara Melava 2025 Live: आज गोरेगाव येथे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “बळीराजा संकटात आहे. आपला बळीराजा संकटात आहे. आपत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, बळिराजाला मदत करण्यासाठी तुम्ही तिकडेच थांबा असे मी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना सांगितले.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकरी संकटात आहे. पशुधन वाहून गेले आहे. घरांची पडझड झाली आहे. मी स्वतः त्यांचे दु:ख पहिले आहे. आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. अनेक शिवसैनिक मदत करत आहेत. मदत पोहोचते आहे. जिथे संकट , जिथे आपत्ती तिथे शिवसेना. जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशीवे राहणार नाही. एकनाथ शिंदे समाजकारणाचे व्रत सोडणार नाही.”
“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार हा माझ्या शब्द आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकरी बांधवानो धीर सोडू नका. टोकाचे पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही. वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्ती असताना घरात बसणार शिवसैनिक असूच शकत नाही. संकटात कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात दिसला पाहिजे.”
Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले?
दसरा मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज आपल्याकडे लक्ष आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी पेटवलेली ठिणगी शिवसेनेची, त्याचा वणवा या मुसळधार पावसात देखील विझू शकत नाही. हे शिवतीर्थ आहे. हे फक्त आपल्या शिवसेनेचे आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.”
ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज मुंबईत पाऊस आहे. मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा. उद्धव ठाकरे यांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा आढकरी हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यांनी दिल्लीतून अमित शहांचे जोडे आणलेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत. त्याचे पूजन ते करणार आहेत. आम्ही विचारांची पूजा करतो. हे शहांच्या पादुकांची पूजा करत आहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो.”