'ही' कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातही इलेक्ट्रिक दुचाकीला खरेदीसाठी जास्त प्राधान्य मिळत आहे. ग्राहकांच्या याचा मागणीकडे लक्ष देत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी चांगल्या रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत.
देशातील इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये सुद्धा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी हजारोंच्या संख्येत इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. यातही सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकून TVS ने प्रथम क्रमांक पटकावला, तर Ather एनर्जीने प्रथमच Ola Electric ला मागे टाकले. तर Bajaj Chetak EV तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.
TVS ने सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 21,052 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करत अव्वल स्थान मिळवलं आहे. कंपनीने सातत्याने आपल्या iQube Electric Scooter ची डिमांड मजबूत ठेवली आहे. उत्तम रेंज, विश्वासार्ह क्वालिटी आणि देशभरात वाढत चाललेलं चार्जिंग नेटवर्क यामुळे या स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
बापूंनाही होती गाड्यांची आवड! स्वातंत्र्यपूर्व काळात ‘या’ कारमधून फिरायचे महात्मा गांधी
Bajaj ने आपल्या Chetak Electric Scooter ची 17,972 युनिट्स विक्री करून दुसरं स्थान मिळवलं. Chetak चं क्लासिक डिझाइन, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सर्व्हिस यांनी या स्कूटरच्या विक्रीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, Ather आता त्याला मागे टाकण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
GST कमी झाला अन् एका झटक्यात ‘या’ बनल्या देशातील सर्वात स्वस्त कार, किमतीत 1 लाखांपर्यंतची घट
लांब काळापासून टॉप-3 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या Ather Energy ने शेवटी Ola ला मागे टाकलं आहे. कंपनीनं सप्टेंबरमध्ये 16,558 युनिट्स विक्री करून तिसरं स्थान मिळवलं. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 70% हिस्सा त्याच्या Rizta Electric Scooter कडून येतो. विशेष म्हणजे आता कंपनीची वाढ दक्षिण भारताबाहेरही झपाट्यानं होत आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये याची मागणी सतत वाढते आहे. मार्च 2024 मध्ये कंपनीकडे केवळ 49 आउटलेट्स होते, तर आता ही संख्या वाढून 109 वर पोहोचली आहे.
एकेकाळी भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकमध्ये आता सातत्याने घसरण होत आहे. सप्टेंबरमध्ये विक्री फक्त 12,223 युनिट्सवर आली आहे. सुरुवातीच्या महिन्यात नोंदणीच्या समस्यांमुळे कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला होता.