Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ४५०% ची विक्रमी वाढ! टीव्हीएस, बजाज अन् एथर मोठ्या फार्मात

भारतात बनणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर आता फक्त देशातील रस्त्यांवरच नाही, तर परदेशातही वेगाने धावत आहेत. एप्रिल-ऑगस्टमध्ये निर्यातीत तब्बल 450% वाढ झाली असून टीव्हीएस, बजाज आणि एथरने मिळून 98% वाटा घेतला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 27, 2026 | 03:17 PM
एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ४५०% ची विक्रमी वाढ! टीव्हीएस, बजाज अन् एथर मोठ्या फार्मात
Follow Us
Follow Us:
  • भारतातून इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्यातीत 450% वाढ होत 15,418 युनिट्सचा विक्रमी टप्पा गाठला आहे.
  • टीव्हीएस, बजाज आणि एथर या तीन कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत तब्बल 98% वाटा आहे.
  • नेपाळ आणि श्रीलंका मार्केटमध्ये भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांची उपस्थिती वेगाने वाढत आहे.
FY2027 च्या पहिल्या 5 महिन्यांतच भारतातून इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्यातीने मोठी झेप घेतली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2026च्या या कालावधीत एकूण 15,418 इलेक्ट्रिक स्कूटर परदेशात पाठवण्यात आल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 2,807 होता. म्हणजेच निर्यातीत जवळपास 450% एवढी प्रचंड वाढ झाली आहे.

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असतानाच परदेशातील मार्केटमध्येही मेड-इन-इंडिया ई-स्कूटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती, पर्यावरणपूरक वाहनांकडे वाढता कल आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार होत असलेली पायाभूत सुविधा यामुळे निर्यात वाढण्यास मदत होत आहे. विशेषतः नेपाळ हे भारतीय इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मोठे मार्केट ठरले आहे.

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

या एक्स्पोर्टमध्ये TVS Motor Company आघाडीवर आहे. कंपनीने एप्रिल-ऑगस्टदरम्यान 6,702 इलेक्ट्रिक स्कूटर निर्यात केल्या. यामध्ये 5,738 आयक्यूब आणि 964 ऑर्बिटरचा समावेश आहे. त्यामुळे एकूण इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत टीव्हीएसचा वाटा 44% आहे.

Bajaj Auto ने 4,818 चेतक इलेक्ट्रिक स्कूटर निर्यात केल्या असून, कंपनीच्या निर्यातीत तब्बल 2,194% वाढ झाली आहे. दुसरीकडे Ather Energyने 3,573 स्कूटर निर्यात करत 23% वाटा मिळवला आहे. एथरच्या निर्यातीत 450 सीरिज आणि रिझ्टा यांचा समावेश आहे.

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत टीव्हीएस, बजाज आणि एथर या तीन कंपन्यांचा टोटल वाटा तब्बल 98% आहे. याशिवाय ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीने 169, हिरो मोटोकॉर्पने 135, रिव्हर मोबिलिटीने 18 आणि होंडाने 3 इलेक्ट्रिक स्कूटर एक्स्पोर्ट केल्या.

ऑगस्टमध्ये एकट्या महिन्यात 3,575 इलेक्ट्रिक स्कूटरची निर्यात झाली, जी मागच्या वर्षाच्या तुलनेत 209% जास्त आहे. सध्याचा वेग कायम राहिल्यास FY2027 मध्ये भारताची इलेक्ट्रिक स्कूटर निर्यात 35,000 युनिट्सचा टप्पा ओलांडू शकते.

Web Title: Electric scooter exports rise tvs bajaj ather india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.