राज्यातील 'एवढ्या' किंमतीच्या Electric Vehicles होणार टॅक्स फ्री ! मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या संख्येत वाढताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्या देखील भारतीय मार्केटमध्ये उत्तम फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्यातील सरकार देखील सकारात्मक दिसत आहे. EV वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार त्यावर सबसिडी देखील देत आहे. यामुळे नक्कीच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक कारवरील टॅक्सबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Sonu Sood च्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात ! ‘या’ इलेक्ट्रिक कारमधून सुरु होता प्रवास
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त करण्याच्या मोठी घोषणा केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी पर्यावरणाबाबत प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की राज्यातील इलेक्ट्रिक वाहनं टॅक्स फ्री करणार. यासोबतच राज्यातील, सर्वच सरकारी कार्यालयाच्या आणि मंत्र्यांची वाहनंही इलेक्ट्रिक असणार,.
महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील टॅक्स मागे घेण्यात येईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पूर्वी डिप क्लिनिंग होत होते आणि मागचे मुख्यमंत्री रस्ते धुवायला जात होते, आताचे मुख्यमंत्री रस्त्यावर जातील का? असा प्रश्न अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं, “परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलं आहे.” हे ऐकल्यावर सभागृहात सगळे हसायला लागले. पुढे फडणवीसांनी असेही म्हटले, “तसं असेल तर मी तयार आहे.”
पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार 2500 ईव्ही बसेस खरेदी करण्याचा विचार करीत आहे. याशिवाय, मेट्रो आणि बसेसच्या माध्यमातून वाहतूक कोंडीवर उपाय करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले. पिंपरी चिंचवडमध्ये ईव्ही वाहनांची संख्या वाढत आहे आणि टु-व्हिलर सेगमेंटमध्येही ईव्ही बाईक्सही विकल्या जात आहेत. ई-चार्जिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये ईव्हीच्या मोठ्या प्रकल्पांची सुरूवात झाली आहे, ज्यामुळे ते सिटी कॅपिटल म्हणून विकसित होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.