फोटो सौजन्य: X.com
भारतात कार विक्री वाढत असतानाच अपघातांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या चिंताजनकपणे वाढत आहे. हा महामार्ग प्रगती आणि सुविधा देणारा असला तरी, त्यावर होणारे अपघात अनेकांना चिंतेत टाकतात. गेल्या काही वर्षांमध्ये या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद यांचा अपघात नागपूरजवळ समृद्धी महामार्गावर झाला. यामुळे एकदा पुन्हा महामार्गावरील अपघातांची समस्या चर्चेत आली आहे. या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर आणि वाहनचालकांच्या काळजीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद आणि काही कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाला आहे. नागपूर महामार्गावरील या अपघातानंतर सोनाली सूद यांची एमजी विंडसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात कारच्या एअरबॅग्ज उघडल्याने सुदैवाने सर्वजण बचावले, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे.
काय सांगता ! Activa च्या USP सोबतच झाला मोठा गेम, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नसणार ‘हा’ फिचर
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या पत्नीची एमजी विंडसर कार एका ट्रकला धडकली. यानंतर कारचे तुकडे झाले. या अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. माहितीनुसार, सोमवारी रात्री १०.३० वाजता हा अपघात झाला असून कारला मागून एका ट्रकने धडक दिली.
सुरक्षिततेसाठी, एमजी विंडसर ईव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, ईएससी, एबीएस, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, मागील पार्किंग सेन्सरसह 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, सर्व चाकांवर टीपीएमएस आणि डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. विंडसर ईव्हीमध्ये ३८ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे.
या बॅटरी पॅकसह, ही कार एका चार्जिंगमध्ये ३३१ किलोमीटरची रेंज देते. जर आपण या कारच्या वास्तविक रेन्जबद्दल बोललो तर ही कार 200 किलोमीटरपर्यंत धावू शकते. एकदा चार्ज केल्यावर ही कार जास्तीत जास्त 250 किमी चालवता येते.
मार्केटमध्ये 2025 Suzuki Avenis आणि Burgman स्कूटर लाँच, नवीन रंगासह मिळणार जबरदस्त मायलेज
एमजी विंडसर ईव्हीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही किंमत कारच्या व्हेरियंटनुसार बदलू शकते. तसेच ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलण्याची देखील शक्यता आहे.