2 लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी फोटो सौजन्य: @auto_nexa (X.com)
आपली स्वतःची कार खरेदी करणे हे साधारण प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यातही आपली कार दिसायला रुबाबदार आणि परफॉर्मन्समध्ये दमदार असावी ही देखील काही जणांची इच्छा असते. देशात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. अशातच जर तुम्ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगल्या कारच्या शोधात असाल तर मग नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली महिंद्रा अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनीने Mahindra Bolero Neo देखील ऑफर करते. जर तुम्ही या एसयूव्हीचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपयांचे डाउनपेमेंट केल्यानंतर ही कार घरी आणू इच्छित असाल, तर दरमहा तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
महिंद्रा बोलेरो निओच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.48 लाख रुपये आहे. जर ही एसयूव्ही राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर आरटीओला सुमारे 1.43 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 55 हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर महिंद्रा बोलेरो निओची ऑन रोड किंमत सुमारे 13.57 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला, तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स मिळेल. अशा वेळी 2 लाख रुपये डाउन पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला सुमारे 11.57 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागेल. जर हे कर्ज बँक 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी देते, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे 18,621 रुपयांचा EMI सलग सात वर्षे भरावा लागेल.
2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.57 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर सात वर्षांच्या कालावधीत तुम्हाला दर महिन्याला 18,621 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या काळात तुम्हाला केवळ व्याज म्हणून सुमारे 4.06 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून तुमच्या Mahindra Bolero Neo ची एकूण किंमत जवळपास 17.64 लाख रुपये होईल.
महिंद्राने Bolero Neo ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केली आहे. मार्केटमध्ये या कारचा थेट मुकाबला Maruti Grand Vitara, Hyundai Creta, Kia Seltos आणि Honda Elevate अशा लोकप्रिय एसयूव्हींसोबत होतो.