
फोटो सौजन्य: Pinterest
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन ऑफर केली आहे. जर तुम्ही या कारचा सीएनजी व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती मासिक ईएमआय द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
‘ही’ कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची भलीमोठी लाइन! November 2025 च्या विक्रीने कंपनीला केले मालामाल
Tata Nexon पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते .टाटा नेक्सॉन स्मार्टच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत 8.23 लाख (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर तुम्हाला आरटीओ शुल्कासाठी अंदाजे 58 हजार रुपये आणि विम्यासाठी 43 हजार रुपये द्यावे लागतील. यामुळे टाटा नेक्सॉनची ऑन-रोड किंमत अंदाजे 9.24 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक एक्स-शोरूम किंमतीवरच तुम्हाला कर्ज देईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 7.24 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागतील. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.24 लाख रुपये देत असेल, तर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा अंदाजे 11,650 रुपये EMI भरावा लागेल.
MG Hector मार्केट गाजवणार भाऊ! लाँच होण्याअगोदरच टिझर रिलीज, ‘या’ दिवशी होणार लाँच
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.24 लाख रुपयांचा कार लोन घेतले तर सात वर्षे तुम्हाला दरमहा 11,650 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही सुमारे 2.54 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 11.78 लाख रुपये इतकी होईल.
टाटा नेक्सॉन ही Sub Four Meter Compact SUV म्हणून ऑफर केली जाते. या सेगमेंटमध्ये ही कार थेट Skoda Kylaq, Kia Syros, Kia Sonet, Maruti Breeza, Hyundai Venue सोबत स्पर्धा करते.