
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर Tata Tigor चा EMI फक्त असेल 'इतकाच'
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच ग्राहक कार खरेदी करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. गेल्या कित्येक वर्षांपासून ही कंपनी भारतीय ग्राहकांच्या मागणीनुसार दमदार कार्स ऑफर करत आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे टाटा टिगोर.
जर तुम्ही टाटा टिगोरचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा या कारसाठी किती EMI द्यावा लागेल?
नवीन 2026 Kawasaki Z650 S झाली सादर, मिळणार नवीन डिझाइन आणि फीचर्स
टाटा मोटर्स कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये टिगोर ऑफर करते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर तुम्हाला आरटीओसाठी अंदाजे 22000 आणि इंश्युरन्ससाठी अंदाजे 33000 रुपये द्यावे लागतील. यामुळे टाटा टिगोरची ऑन-रोड किंमत अंदाजे 6.04 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच तुम्हाला कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत जर तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट दिले, तर तुम्हाला सुमारे 4.04 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागतील. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.04 लाख रुपये कर्ज देते, तर पुढील 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 6,499 रुपयांचा EMI भरावा लागेल.
New Hyundai Venue आली रे! फक्त ‘इतक्या’ हजारात बुक करा SUV आणि 4 नोव्हेंबरला डायरेक्ट चावी खिशात
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.04 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षे दरमहा 6,499 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही Tata Tigor च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 1.42 लाख रुपये व्याज म्हणून द्याल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड चार्जेस आणि व्याज मिळून कारची एकूण किंमत जवळपास 6.45 लाख रुपये इतकी होईल.