फोटो सौजन्य: @KawasakiUSA/ X.com
भारतात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक रायडर्स तर नेहमीच अशा बाईकच्या शोधात असतात, जी त्यांना उत्तम परफॉर्मन्ससह चांगली राइड प्रदान करेल. देशात अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या बाईक्स मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे कावासाकी.
नुकतेच कावासाकीने त्यांच्या मध्यम वजनाच्या नेकेड बाईक लाइनअपमध्ये एक नवीन मॉडेल, 2026 Z650 S जोडले आहे. ही बाईक सध्या स्टॅंडर्ड Z650 सोबत विकली जाईल, परंतु डिझाइन आणि फीचर्समध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
New Hyundai Venue आली रे! फक्त ‘इतक्या’ हजारात बुक करा SUV आणि 4 नोव्हेंबरला डायरेक्ट चावी खिशात
नवीन Z650 S चा लुक आता आधीपेक्षा अधिक शार्प आणि मस्क्युलर दिसतो. याचा फ्रंट डिझाईन आता Z900 वरून इन्स्पायर्ड आहे, ज्यामध्ये तीन-लॅम्प असलेला LED हेडलाइट सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, टँक श्राउड आता अधिक रुंद आणि पुढे वाढवलेले आहेत, ज्यामुळे बाईकचा फ्रंट भाग अधिक बोल्ड आणि दमदार दिसतो.
रायडिंग पोझिशनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता बाईकमध्ये 30mm रुंद हँडलबार आणि री-पोजिशन केलेले फुटपेग्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे रायडिंग ट्रायंगलमध्ये बदल होतो आणि रायडिंग कम्फर्ट वाढतो. सीट हाइट सुमारे 15mm ने वाढवण्यात आली आहे, तर पिलियन सीट आता 20mm ने अधिक रुंद आणि 10mm ने जास्त पॅडिंगसह येते. म्हणजेच आता रायडर आणि पिलियन दोघांनाही अधिक आरामदायी अनुभव मिळतो.
Farhan Akhtar ने खरेदी केली Mercedes Maybach GLS600, किंमत वाचूनच डोळे विस्फारतील
नवीन Kawasaki Z650 S मध्ये 4.3-इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येतो. Kawasaki Rideology App द्वारे ब्लूटूथच्या माध्यमातून फोन आणि एसएमएस अलर्ट्स, तसेच राइड डेटा सहज ऍक्सेस करता येतो.
2026 Kawasaki Z650 S ची किंमत ब्रिटनमध्ये £7,199 (सुमारे 8.42 लाख रुपये) पासून सुरू होते. ही बाईक तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. Z650 S ही स्टँडर्ड Z650 ला रिप्लेस करेल की दोन्ही मॉडेल काही काळ एकत्र विकले जातील याबाबत कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र, Z650 S चे डिझाइन ब्रँडच्या नवीन Z मॉडेल्स सारखे दिसत आहे.






