फोटो सौजन्य: X.Com
भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी अनके लोकप्रिय कार ऑफर केल्यात. अशीच एक ऑटो कंपनी Hyundai. कंपनीने नेहमीच भारतीय ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. Hyundai Venue ने ग्राहकांच्या मनात घर केले आहे. अशातच चर्चा रंगली होती की कंपनी लवकरच या कारचे नवीन व्हर्जन भारतात लाँच करणार. अखेर कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे.
भारतातील सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणारी ह्युंदाई व्हेन्यू आता एका नवीन आणि आकर्षक अवतारात कमबॅक आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की नवीन 2025 ह्युंदाई व्हेन्यू येत्या 4 नोव्हेंबर रोजी लाँच होईल. ह्युंदाईने देशभरात आधीच बुकिंग सुरू केली आहे. जर तुम्ही ही लोकप्रिय एसयूव्ही बुक करण्याचा विचार करत असाल, तर लाँच करण्यापूर्वी तुम्ही ती फक्त 25000 फक्त बुक करू शकता.
Maruti Dzire CNG व्हेरिएंट घरी आणण्याचा फुल प्रूफ प्लॅन, फक्त द्यावा लागेल इतकाच EMI?
ह्युंदाईने नवीन जनरेशनच्या व्हेन्यूसाठी बुकिंग रक्कम 25000 रुपयात निश्चित केली आहे. तुम्ही देशभरातील कोणत्याही अधिकृत ह्युंदाई डीलरशिपला भेट देऊन किंवा कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे तुमची कार बुक करू शकता. व्हेन्यू ही ह्युंदाईच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. सणासुदीचा हंगाम आणि या प्रमुख अपडेटमुळे, बुकिंग जलद होण्याची अपेक्षा आहे. लवकर बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे.
2025 च्या नवीन व्हेन्यूला एक मोठे अपडेट मिळाले आहे. एक्सटिरिअर आणि इंटिरिअरनढे मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन व्हेन्यू आता ह्युंदाईच्या मोठ्या एसयूव्ही, क्रेटा आणि अल्काझारपासून प्रेरित दिसते. त्यात अधिक ठळक फ्रंट फॅसिया, नवीन एलईडी डीआरएल आणि एक मस्क्युलर लूक आहे.
Farhan Akhtar ने खरेदी केली Mercedes Maybach GLS600, किंमत वाचूनच डोळे विस्फारतील
केबिन पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम असण्याची अपेक्षा आहे. यात ड्युअल 12.3-इंच वक्र पॅनोरॅमिक डिस्प्ले (इन्फोटेनमेंट आणि डिजिटल क्लस्टरसाठी), व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 एडीएएस (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सारखी हाय-टेक फीचर्स देखील मिळू शकतात.
नवीन ह्युंदाई व्हेन्यू येत्या 4 नोव्हेंबरला लाँच होणार असून ही कार टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV 3XO, किआ सोनेट आणि मारुती ब्रेझा सारख्या कारशी थेट स्पर्धा करेल.






