Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंजिन ऑईल चांगलं आहे कि खराब कसं ओळखायचं? हे आहेत तीन उपाय

आजकाल बाजारात बऱ्याच प्रकारची बनावटी इंजिन ऑईलची विक्री होत आहे. अशा ऑईलमध्ये पाहिजे ते केमिकल्स, आवश्यक एडीटीव नसतात, ज्याच्यामुळे इंजिनाची पूर्ण सुरक्षा होत नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 29, 2026 | 06:32 PM
इंजिन ऑईल चांगलं आहे कि खराब कसं ओळखायचं? हे आहेत तीन उपाय
Follow Us
Follow Us:

नेहमी कार चालवत असूनही बरेच लोक इंजिन ऑईलच्या कॉलिटी वरती लक्ष देत नाहीत आणि बनावटी  किंवा खराब ऑईल वापरतात. यामुळे इंजिनाची काम करण्याची शक्ती खराब होते. बरोबरच पुढे जाऊन मोठा खर्च त्याच्या दुरुस्ती साठी करावा लागतो. आजकाल बाजारात या बनावटी नकली,  ऑईलचा व्यापार बोकाळलाय. अशा ऑईलमध्ये आवश्यक केमिकल्स आणि गोष्टी नसल्याने, इंजिनाची सुरक्षा तर होतच नाही उलट इंजिनाच्या आयुष्याला धोका निर्माण होतो.

हळूहळू इंजिनाचे पार्टस खराब व्हायला सुरुवात होते, मायलेजही कमी होतं आणि बऱ्याचदा इंजिन बंद पडण्याचीही वेळ येते. अशात जर तुम्हालाही, तुमच्या कारसाठी वापरणारे ऑईल चांगले आहे कि खराब याची ओळख करावयाची असेल तर, या तीन पद्धतीनी ते होऊ शकते.

१.ऑईलचा रंग आणि घट्टपणा

इंजिन ऑईलची कॉलिटी ओळखण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे त्याचा रंग आणि टेक्स्चर बघणं. नवीन आणि चांगलं इंजिन ऑईल हलक्या सोनेरी रंगाचं आणि स्वच्छ असतं. याउलट ऑईल जर जास्त काळ्या रंगाचं, जास्त घट्ट दिसत असेल, शिवाय त्यात कचरा,घाण दिसत असेल तर ते ऑईल खराब झालेलं असतं. बऱ्याचदा बनावटी ऑईलमध्ये पाण्यासारखी भेसळ दिसते, जी इंजिनसाठी धोकादायक असते. जर ऑईल मधून जळल्यासारखा वास येत असेल, तर समजून जायला हवे कि ऑईल खराब आहे. ऑईलचे जास्त काळे दिसणे, त्यात मातीचे कण असणे, शिवाय त्यातून जळल्याचा वास येणे हे खराब ऑईलचे संकेत आहेत.

२. पॅकेजिंग आणि सीलला लक्ष देऊन पाहा

बनावटी इंजिन ऑईलची ओळख त्याच्या पॅकेजिंगवरूनही केली जाउं शकते. खऱ्या आणि चांगल्या कंपनींच्या ऑईलची पॅकेजिंग नीटनेटकी आणि प्रोफेशनल असते. तेच बनावटी ऑईलच्या बॉटलवर बऱ्याच छोट्या छोट्या चुका आढळतात. जर बॉटल वरची प्रिंटींग धूसर असेल, स्पेलिंग चुकीची असेल किंवा लोगो तिरका वगैरे दिसत असेल तर अशा ऑईलला खरेदी करण्यापासून सावधान राहिले पाहिजे. आजकाल बहुतेक मोठ्या कंपन्या QR कोड आणि बॅच नंबर देतात, ज्याच्यामुळे त्याची ओळख करता येईल. जर हा नंबर गायब असेल किंवा ओळखता येत नसेल तर ऑईल बनावटी आहे हे ओळखून जायला पाहिजे.

३. कारचा परफॉर्मन्स

जर तुमची कार पहिल्यापेक्षा कमी परफॉर्मन्स देत असेल तर सामुजून जावं कि हा खराब इंजिन ऑईलचा संकेत आहे. खराब किंवा जुनं ऑईल इंजिनाला नीट लुब्रिकेट करू शकत नाही, ज्यामुळे बऱ्याच अडचणी गाडीला सहन कराव्या लागतात. उदाहरण म्हणजे इंजिनातून खट-खट किंवा टिक-टिक असा आवाज येत असेल तर याचा अर्थ ऑईल नीट काम करत नाही. असं तेव्हा होतं जेव्हा इंजिनांच्या पार्टसमध्ये जास्त घर्षण होतं. याशिवाय जुनं खराब इंजिन ऑईल इंजिनाची उष्णता कमी करू शकत नाही. यामुळे ओव्हरहिटिंगची समस्या उत्पन्न होते आणि मायलेजही कमी व्हायला सुरुवात होते. जास्त घर्षण झाल्यामुळे इंजिनाला जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळं जास्त इंधनाची खपत होते. कारचं पिकअपकमी होणं, गाडी जड वाटणं किंवा सारखं सारखं गाडीचं थांबणं हे खराब ऑईल मुळे होऊ शकत.

Web Title: Engine oil identification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • automobile news
  • cars

संबंधित बातम्या

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स
1

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू
2

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण
3

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण

सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग
4

सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.