
फोटो सौजन्य: iStock
पावसाळ्यात एकीकडे हिरवाई पसरली जाते. उन्हाळ्यात उजाड दिसणारा निसर्ग पावसाळ्यात मात्र हाच निसर्ग पूर्णपणे हिरवाईत बहरलेला असतो. अशावेळी अनेक जण आपापली कार घेऊन बिनधास्त फिरायला जातात. मात्र, या मोसमात कार चालविण्यासाठी अनेक आव्हाने देखील समोर येतात. म्हणूनच आज आपण पावसात कारच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊयात.
पावसाळ्यात टायर्सची ग्रीप सर्वात महत्वाची असते कारण पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात. म्हणून, टायरची ट्रेड डेप्थ किमान 2.5 मिमी असावी. कोणताही टायर फाटलेला किंवा जीर्ण होऊ नये. टायर जास्त फुगलेला नसावा. जर टायर 4-5 वर्षे जुना असेल किंवा 40,000-50,000 किमी पेक्षा जास्त धावला असेल तर तो बदलणे चांगले.
Uber, Rapido आणि Ola टेन्शनमध्ये ! बंगळुरूनंतर महाराष्ट्रात सुद्धा Bike Taxi बॅन होणार?
पावसात चांगली व्हिसिबिलटी राखणे हे सर्वात मोठे आव्हान असते आणि विंडशील्ड वायपर तुम्हाला यामध्ये मदत करतात. वायपरची रबर स्ट्रिप जीर्ण किंवा फाटलेली नाही याची खात्री करा. तसेच वॉशर फ्लुइडचा नोझल अडकलेला नाही आणि फ्लुइडमध्ये घाण किंवा चिखल नाही याची खात्री करा. विंडशील्डवर रेन-रेपेलेंट कोटिंग लावणे देखील चांगले होईल.
पाऊस आणि धुक्यात कार चालवताना, हेडलाइट्स आणि फॉग लॅम्प्स हेच मार्ग दाखवतात. म्हणून, हेडलाइट्स आणि फॉग लाईट्सची चमक योग्य आहे की नाही ते तपासा. लेन्सवर धुकं, धूळ किंवा अस्पष्टता आहे की नाही याकडे देखील लक्ष द्या. याशिवाय, टेललाइट्स आणि इंडिकेटर देखील योग्यरित्या काम करत आहेत की नाही याची खात्री करणे देखील महत्त्वाचे आहे. मुसळधार पावसात या लाइटिंग सिस्टम तुमची सर्वात मोठी सेफ्टी बनतात.
रस्ते पावसात ओले असतात. याचा ब्रेकिंगवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ब्रेक योग्यरित्या आणि वेळेवर काम करणे महत्वाचे आहे. यासाठी, ब्रेक पॅड जीर्ण झाले आहेत की नाही ते तपासा. ब्रेक लावताना जर आवाज किंवा धक्का जाणवला तर ब्रेकिंग सिस्टम तपासण्याची गरज आहे.
पावसाळ्यात, पाण्यामुळे कारच्या मेटलच्या भागांचे नुकसान होऊ शकते आणि त्यांना गंज पकडू शकतो. म्हणून, बॉडी पॅनल्सवर गंजाचे काही चिन्ह आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. विशेषतः दरवाजे, बोनेट किंवा अंडरबॉडी भागांमध्ये गंज येण्याची सुरुवातीची चिन्हे ओळखा. अँटी-रस्ट कोटिंग वेळेवर करा आणि जर गंज खूप जास्त असेल तर तो भाग बदलणेच चांगले होईल.