Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV की पेट्रोल कार? ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त? पाहा खर्चाचे संपूर्ण गणित

एप्रिल २०२६ मध्ये इलेक्ट्रिक कार, एसयूव्ही आणि एमपीव्हीच्या २३,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यावरुन लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 03:35 PM
EV VS Petrol Car

EV VS Petrol Car

Follow Us
Follow Us:
  • EV की पेट्रोल कार?
  • ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त?
  • पाहा खर्चाचा संपूर्ण तपशील
गेल्या काही काळात भारतातील इलेक्ट्रिक बाजारपेठेत वेगाने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक आता शाश्वत पर्यायांचा विचार करत आहे. एप्रिल २०२६ मध्ये इलेक्ट्रिक कार, एसयूव्ही आणि एमपीव्हीच्या २३,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यावरुन लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. परंतु अनेक लोकांच्या मनात इलेक्ट्रिक कार चालवण्याच्या खर्चाबाबत शंका निर्माण होते. विशेष करुन ५०० किमीच्या प्रवासासाठी लोक साहजिकच खर्चाची तुलना पेट्रोल-डिझेलच्या कारशी करतात. आज आपण या खर्चाचे गणित समजून घेणार आहोत.

Force Motors ची नवी Traveler N रेंज लॉन्च; आता अधिक मजबूत आणि हायटेक

५०० किमी प्रवासासाठी खर्चाचे गणित

जेव्हा खर्चाची तुलना करतो, तेव्हा इलेक्ट्रिक कारची बचत स्पष्टपणे दिसते. हे समजून घेण्यासाठी आपण Tata Harrier EV सारख्या मोठ्या बॅटरी पॅक म्हणजे ७५KwH असलेल्या गाड्याचे उदाहरण घेऊयात.

इलेक्ट्रिक कारचा खर्च

  • इलेक्ट्रिक SUV मध्ये सुमारे ७५ kWh क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे. कंपनीनेच्या दाव्यानुसार, ही कार ६०० किलोमीटरहून अधिक रेंज देते.
  • पण प्रत्यक्ष वाहन चालवण्याच्या परिस्थिती ही कार सहजपणे ५०० किलोमीटरचे अंतर कापते.
  • चार्जिंगमुळे काही प्रमाणात उर्जेचा ऱ्हास होतो. ज्यामुळे बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी ८० ते ८५ युनिट्स खर्च होतात.
  • विजेचा दर ८ रु प्रति युनिट असे आपण गृहित धरल्यास ५०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी येणारा खर्च ६०० ते ७०० रुपये इतका असेल.

पेट्रोल आणि डिझेलचा खर्च

याउलट पेट्रोल कारने प्रवास केल्यास खर्च वाढतो. हे कसे समजून घेऊयात.
  • तर १५ किमी मायलेज देणाऱ्या पेट्रोल कारला ५०० किमीसाठी साधारण ३३ लिटर पेट्रोलची गरज भासते.
  • १०० रुपये प्रति दराने हा खर्च ३,३०० रुपयांपर्यंत होतो.
  • डिझेल कार १८ किमी मायलेजची असल्यास २८ लिटर डिझेल लागते.
  • जर डिझेलचा दर ९० रुपये प्रति लीटर असेल, तर समुारे २,५०० रुपये खर्च येऊ शकतो.

इलेक्ट्रिक कार्स अधिक किफायतशीर का?

  • वरील माहितीची तुलना केल्यास लक्षात येते की पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारचा खर्च जवळपास ५ पटीने कमी आहे.
  • पेट्रोलसाठी तुम्हाला ३,३०० रुपये मोजावे लाग असताना, ईव्ही केवळ ७०० रुपयांत प्रवास पूर्ण करते.
  • याशिवाय इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये इंजिन क्लब, गिअरबॉक्स किंवा इंजिन ऑइल बदलण्याची गरज नसते.
  • तसेच २०२६ मध्ये आता चार्जिंग स्टेशनही उपलब्ध झाले  आङेत यामुळे बॅटरी संपण्याची भीतीही कमी झाली आहे.
यामुळे रोजचा प्रवास लांब पल्ल्याचा असेल तर सुरुवातील तुम्हाला ईव्ही खर्चिक वाटू शकते. पण पेट्रोलच्या तुलनेत तुमची २,६०० रुपयांची बचत होते.

Car Safety Tips : नवी कार खरेदी केली? मग ‘या’ ५ ॲक्सेसरीज आहेत सर्वात महत्त्वाच्या

Web Title: Ev vs petrol car 500km trip cost comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • automobile news
  • electric car
  • Petrol Cars

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
2

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
3

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
4

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.