Car Safety Tips : नवी कार खरेदी केली? मग 'या' ५ ॲक्सेसरीज आहेत सर्वात महत्त्वाच्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डॅशकॅम :
रस्त्यावरील वाढती गर्दी पाहता आणि अपघातांचे प्रमाणा पाहता डॅशकॅम कारला लावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आङे. २०२६ मध्ये आता एआय आधारित डॅशकॅम उपलब्ध आहेत. हे केवळ चित्रीकरण करत नाहीत, तर धोक्याची पूर्वसूचनाही देतात. यामुळे अपघात किंवा वादाच्या प्रसंगी रेकॉर्डिंग कायदेशीर पुरवा म्हणून कामी येते. तसेच इन्शुरन्स क्लेम करणे देखील सोपे होते.
फ्लोअर मॅट्स :
पावसाळा असो वा उन्हाळा, गाडीची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी 7D किंवा ९D प्लोअर मॅट्स वापरणे फायदेशीर ठरेल. या मॅट्समुळे धूळ, पाणी, कचरा कारच्या ओरिजनल कार्पेट्सपर्यंत पोहोचत नाही. यामुळे कारमध्ये ओलावा राहत नाही आणि बुरशी किंवा दुर्गंधही येत नाही.
रात्रीच्या प्रवासासाठी LED लाईट्स :
अनेकदा कार कपंनीकडून मिळणारे हेडलाईट्स महामार्गावर पुरेसा प्रकाश देत नाहीत. यामुळे रात्रीच्यावेळी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी LED किंवा HID हेडलाईट अपग्रेड असणे महत्त्वाचे आहे. तसेच उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेता UV प्रोटेक्शन विंडो फिल्म्स आणि सनशेड्स लावल्याने केबिन थंड राहते. डॅशबोर्ड, सीट कव्हर्सचे नुकसान टळते.
इमर्जन्सी किट :
प्रवासात कधीही कारमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. अशा वेळी टायर इन्फ्लेटर, पोर्टेबल जंप स्टार्टर, अग्निशमन यंत्र आणि ग्लास ब्रेकर यांसारख्या गोष्टी कारमध्ये असणे महत्त्वाचे आहे. या छोट्या वाटणाऱ्या वस्तू कठीण वेळी मोठी मदत करतात.
स्मार्ट तंत्रज्ञान आणि ५जी कनेक्टिव्हिटी :
कार आता केवळ वाहन राहिली नसून एक स्मार्ट डिव्हाइस बनली आहे. ५जी कनेक्टिव्हीटीमुळे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि रिमोट डायग्नोस्टिक्स सोपे झाले आहे. पर्यायवरणाचा विचार करुन सस्टेनेबल आणि इको-फ्रेंडली अॅक्ससरीजचा ट्रेंड वाढत आहे.
नवीन कार घेतली असेल किंवा घेण्याचा विचार करत असला तर या अॅक्सेसरीज नक्की खरेदी करा. तुमच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल.






